Tuesday, December 24, 2024
Homeगुन्हेगारीMumbai | महाराष्ट्र हादरला...ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार...फेसबुक लाइव्ह सुरु असताना तीन...

Mumbai | महाराष्ट्र हादरला…ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार…फेसबुक लाइव्ह सुरु असताना तीन गोळ्या झाडल्या…Viral Video

Mumbai : राज्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस बिहार सारखी होत चालल्याची दिसत आहे. काल रात्री दहीसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. त्याने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या. त्यामुळे त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आरोपी मॉरिस भाईने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. त्यानंतर अभिषेक घोसाळकर आपली भूमिका मांडतात. त्यानंतर घोसाळकर यांचं बोलणं संपल्यानंतर ते जागेवरुन उठतात आणि त्यांच्यावर अतिशय जवळून गोळीबार केला जातो.

अभिषेक घोसाळकर उठत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दिसतो. मोबाइलकडे पाहत असतानाच त्यांना अत्यंत जवळून चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यांच्या पोटावर गोळ्या लागल्या. गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर ठेवून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मन विचलित करणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: