Mumbai Loksabha : राज्यातील लोकसभेच्या ८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं तर आज उर्वरित जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून त्यासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची लिस्ट जाहीर केली यामधे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कापण्यात आला आहे. पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. असं असतानाही पक्षाने त्यांचा पत्ता कापला आहे. त्यांच्या जागी प्रसिद्ध सरकारी वकील उज्जवल निकम यांना तिकीट दिलं आहे. तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. पूनम महाजन यांनाच पक्ष तिकीट देईल असं सांगितलं जात होतं. पण त्यांचा पत्ता कापण्यात आल्याने त्या काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
या सर्व पार्श्वभूमीवर पूनम महाजन यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मला गेल्या दहा वर्षापासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी देण्यात आली. त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. मला एक खासदार म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून स्नेह दिल्याबद्दल मतदारसंघातील कुटुंबा समान जनतेची मी सदैव ऋणी राहील. आणि हे नातं कायम राहील अशी आशा आहे. माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मला, राष्ट्र पहिलं, नंतर आपण ही शिकवण दिली आहे. आजीवन याच मार्गावर मी चालेल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण सदैव देश सेवेसाठी समर्पित राहील, असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.”
10 वर्षों तक एक सांसद के रूप में मुंबई उत्तर मध्य लोकसभा क्षेत्र की सेवा का मौक़ा देने के लिए @BJP4India और प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का धन्यवाद।
— Poonam Mahajan (मोदी का परिवार) (@poonam_mahajan) April 27, 2024
मुझे एक सांसद ही नहीं बल्कि एक बेटी की तरह भी स्नेह देने के लिए मैं क्षेत्र की परिवार समान जनता की सदैव ऋणी रहूँगी, और यही…