मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. गोरेगावजवळील पाच मजली इमारतीला रात्री उशिरा भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईतील एचबीटी आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथके तैनात आहेत.
मिळालेल्या माहितनुसार, पश्चिम गोरेगाव येथील ऑफ एमजी रोडवरील जय संदेश इमारतीत शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, इमारतीत अजूनही अनेक लोक अडकले असल्याची माहिती समोर येत असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, गोरेगावमधील पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांवर मुंबईतील एचबीटी आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चार कार आणि 40 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या
त्याचवेळी या आगीत चार कार आणि 40 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Mumbai | Goregaon fire | Till now, out of a total of 46 people injured in the fire, 7 of them have lost their lives and 39 are under treatment in HBT and Cooper Hospital: Mumbai Police
— ANI (@ANI) October 6, 2023
Details from other private hospitals where the injured were taken are awaited.