Mumbai | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यावर भाजप आमदाराने गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे भाजप आमदाराने शिवसेनेच्या एका नेत्यावर पोलिस ठाण्यात गोळ्या झाडल्या. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदाराला ताब्यात घेतले आहे. येणाऱ्या लोकसभा निवडुकीपूर्वीच भाजपा आणि शिंदे गटात चांगली जुंपली असल्याचे दिसत आहे.
काय प्रकरण आहे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते महेश गायकवाड आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. या वादामुळे काल रात्री दोन्ही पक्षांनी उल्हासनगरचे हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. दोन्ही पक्षातील वाद वाढत जाऊन पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला. यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला. पोलिसांनी सांगितले की, एका बाजूने गोळीबार झाला, त्यात दोन जण जखमी झाले.
घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबार करणाऱ्या भाजप आमदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेना नेत्याच्या शरीरातून पाच गोळ्या काढण्यात आल्या आहेत, मात्र त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या मुलासोबत गैरवर्तन केल्याने त्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, असे भाजप आमदाराने सांगितले.
BJP MLA Ganpat Gaikwad Shot Mahesh Gaikwad, Ex Corporator & Ulhas Nagar, Shiv Sena Shinde Chief.
— Syed Rafi – నేను తెలుగు 'వాడి'ని. (@syedrafi) February 2, 2024
The incident took place in the cabin of the senior police inspector.
Injured Mahesh Gaikwad & Rahul, who is also injured, are admitted to the hospital. pic.twitter.com/TuDgYiGevZ