Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingMumbai | लोकल मध्ये लेडीज डब्यात दोन महिलांमध्ये वाद विकोपाला गेला अन…हाणामारीचा...

Mumbai | लोकल मध्ये लेडीज डब्यात दोन महिलांमध्ये वाद विकोपाला गेला अन…हाणामारीचा पाहा व्हायरल Video

Mumbai : मुंबई लोकल ट्रेनमध्ये सीटवरून दोन महिलांमधील वाद इतका वाढला की या क्षुल्लक गोष्टीवरून हाणामारी झाली. महिलांनी एकमेकींचे केस उपटून थापाडांचा वर्षाव केला. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानेही दोन्ही महिलांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र यात ती स्वत: जखमी झाली.

ही घटना ठाणे ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यानची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-पनवेल लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात महिला एकमेकांचे केस ओढताना दिसतात. दरम्यान, शारदा उगले नावाच्या महिला कॉन्स्टेबलने दोन महिला प्रवाशांमधील भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती स्वत: जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाशी रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस कटरे यांनी सांगितले की, “सीटवरून झालेल्या वादानंतर काही महिलांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे. दोन्ही महिलांनी तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: