Sunday, December 22, 2024
Homeराज्यबाळापूर येथे मोहरम निमत्त मिरवणूक शांततेत...

बाळापूर येथे मोहरम निमत्त मिरवणूक शांततेत…

बाळापूर – सुधीर कांबेकर

संपूर्ण विदर्भात प्रसिंध्ध असलेल्या बाळापूर येथील मोहरम उत्सव अत्यंत शांततेत व उत्साही तसेच धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. तसेच १९ जुलै रोजी शहरातील मिरवणूक मार्गावर मिरवणूक काढण्यातआली असून मिेरवणूक शांततेत पार पड़ली.

गेली ७ दिवसांपासून मुस्लीम बांधवांनी विविध भागात मौला सवाऱ्यांची स्थापना केली होती. त्या निमित्त सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरातील विवीध भागातून सवाऱ्या मौला झुल्फकार बादी बाज़ारातील मुख्य चौकात येऊन मिरवणुकीस सुरूवात करण्यात झाली.मुख्य चौकातून निघालेली मिरवणूुक शाही मसजीद चौक, अंजूमन हायस्कूल,जुनीचावडी, जैन मंदिर मार्गे वेसी जवळून राममंदिराकडे रवाना होऊन विसर्जित झाली. ही मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या मिरवणुकीदरग्यान एकात्मतेचे दर्शन सर्वानाच घडले.

सामाजिक एकतेचे दर्शन

आमदार नितीन देशमुख यांनी मिरवणुकीदरम्यान भेट दिली तर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनीही बाळापूरळा भेट दिली.उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज, पोनि. अनिल जुमळे आदींनी बंदोबस्त चोख ठेवला होता.यावेळी मोहरमनिमित्त काढण्यात आलेले मिरवणुकीमध्ये सामाजिक एकतेचे व जातीय सलोख्याचे सुखदचित्र पहावयास मिळाले. शांतता समिती सदस्यांनी मिरवणूक शांततेतपार पड़ावी, यासाठी अथक परिश्रमघेतले…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: