MSP : सध्या दिल्लीच्या शेतकर्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करणे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धडकले. मात्र त्यांना रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचा पहिला हमीभाव देताना त्यांनी केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास स्वामीनाथन आयोगानुसार किमान आधारभूत किंमत MSP (न्यूनतम समर्थन मूल्य) दिली जाईल, असे सांगितले आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी छत्तीसगडमध्ये पोहोचलेले राहुल गांधी म्हणाले, “देशातील शेतकऱ्यांना जे मिळायला हवे ते मिळत नाही. त्यामुळेच शेतकरी दिल्लीच्या दिशेने जात आहेत, मात्र त्यांना रोखले जात आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. शेतकरी एवढेच सांगतात – आमच्या कष्टाचे फळ आम्हाला मिळाले पाहिजे.
राहुल गांधींनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले, ‘शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे! स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांवर किमान MSP कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल 15 कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी सुनिश्चित करून त्यांचे जीवन बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे.
किसान भाइयों आज ऐतिहासिक दिन है!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 13, 2024
कांग्रेस ने हर किसान को फसल पर स्वामीनाथन कमीशन के अनुसार MSP की कानूनी गारंटी देने का फैसला लिया है।
यह कदम 15 करोड़ किसान परिवारों की समृद्धि सुनिश्चित कर उनका जीवन बदल देगा।
न्याय के पथ पर यह कांग्रेस की पहली गारंटी है।#KisaanNYAYGuarantee
राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘मणिपूर भाजपने जाळले. आम्ही आदिवासी भागात जाऊन त्यांच्याशी बोलत आहोत. चिनी वस्तू भारतात विकल्या जात आहेत. देशात महागाई वाढत आहे. भारत जोडो यात्रेत प्रत्येक राज्यातून लाखो लोक आले आहेत. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडावे लागेल. हिंसाचार न पसरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपचे कार्यकर्ते द्वेष पसरवत आहेत.
किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने शेतकरी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ दिल्लीपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी (12 फरवरी) केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकरी नेत्यांची बैठक अनिर्णित राहिल्याने मंगळवारी शेतकऱ्यांनी दिल्लीत मोर्चा काढण्यास सुरुवात केली.
शहराच्या सीमावर्ती ठिकाणी सुरक्षेसाठी पोलिसांनी काँक्रीटचे ब्लॉक, लोखंडी खिळे आणि कंटेनरच्या भिंती उभारल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ते ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांशी झटापट होत आहे.