Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingएमएस धोनीची रोल्स रॉयस सवारी...व्हायरल व्हिडिओ...

एमएस धोनीची रोल्स रॉयस सवारी…व्हायरल व्हिडिओ…

न्युज डेस्क – भारतीय संघाचा माजी कर्णधार त्याच्या कारच्या छंदामुळे चर्चेत आहे. धोनीचे कार आणि बाइक्सवरील प्रेम कोणापासून लपलेले नाही. नुकताच व्यंकटेश प्रसादने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये धोनीच्या घरातील त्याचे गॅरेज दाखवण्यात आले होते.

धोनीचे गॅरेज एखाद्या शोरूमपेक्षा कमी नाही. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये धोनी विंटेज रोल्स रॉयस कार चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ रांचीचा आहे. कॅप्टन कूल धोनी त्याच्या मूळ गावी रांचीच्या रस्त्यावर त्याची विंटेज रोल्स रॉयस चालवताना दिसला आहे.

त्याचा हा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धोनी 1980 सालची विंटेज रोल्स रॉयस गाडी चालवताना दिसत आहे.

एमएस धोनीकडे अनेक नवीन आणि जुन्या कारचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे Hummer H2 ते अलीकडील KIA EV6 पर्यंतचे कारचे कलेक्शन आहे ज्याची किंमत 61 लाख रुपये आहे. धोनीकडे इतरही अनेक उत्तम कार आहेत. त्याचबरोबर धोनीला बाइक्सचीही खूप आवड आहे.

नुकताच धोनीच्या कार आणि बाईकच्या कलेक्शनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहून हे शोरूम असल्यासारखे वाटले. हा व्हिडिओ माजी खेळाडू व्यंकटेश प्रसादने शेअर केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: