Sunday, December 22, 2024
Homeराज्यकु. आदिती धनवडे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तेरावी...

कु. आदिती धनवडे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तेरावी…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेतलेल्या जुलै 2022 शिष्यवृत्ती परीक्षेत गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलने अभूतपूर्व यश संपादित केले. इयत्ता आठवी मधील 3 विद्यार्थिनीनी शिष्यवृत्ती मिळवली आहे.

यामध्ये 1 विद्यार्थिनी राज्य पातळीवर तर 2 विद्यार्थिनी जिल्हा पातळीवर चमक दाखवली आहे. इयत्ता आठवी मधील कु. आदिती अशोक धनवडे हिने 254 गुण मिळवीत राज्यात तेरावा क्रमांक पटकावला, तर कु. अर्पिता अशोक कांबळे (गुण 232) व कु. मधुरा सतीश साळुंखे (गुण 226) या विद्यार्थिनींनी जिल्हा शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. जाधव, संस्था अध्यक्ष श्री. एम. एस. पाटील, उपाध्यक्ष, सर्व संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: