Monday, December 23, 2024
Homeसामाजिकमा.श्री.राजेंद्र मुळक यांनी हृदयापासून सेवा करून केले हृदय रोगाचे निदान...

मा.श्री.राजेंद्र मुळक यांनी हृदयापासून सेवा करून केले हृदय रोगाचे निदान…

रामटेक – राजु कापसे

आरव आशिष मचाले वय 11 महिने मुक्काम नंदापूरी या बाळाला हृदयाची समस्या होती. बाळाचं वय कमी असल्यामुळे त्याच्या उपचारात भरपूर अडचणी येत होत्या. खाजगी काही हॉस्पिटल मध्ये नेल्यानंतर उपचारासाठी मोठं मोठी रक्कम सांगितली जात होती.

एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आरव च्या पालकांसमोर होता. शेवटी मनोज नौकरकर या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मा.श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली व शेवटी मुळक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या ब्लॉकेज चे आणि हार्टचे ऑपरेशन यशस्वीरीत्या निशुल्क पार पडले. राजेंद्र मूळक रुग्ण सहायता कक्षा कडून निशुल्क ऑपरेशन करण्यात आल्यामुळे आरव चे वडिल व गावकरी मंडळीनी मा.श्री.राजेंद्र मुळक यांचे कोटी कोटी आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: