Saturday, October 26, 2024
Homeराज्यखासदार संजयकाका पाटील दुष्काळी तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर मॅरेथॉन दौऱ्याद्वारे संवाद यात्रा...

खासदार संजयकाका पाटील दुष्काळी तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर मॅरेथॉन दौऱ्याद्वारे संवाद यात्रा…

(दुष्काळी गावातील शेतकऱ्यांच्यासाठी दौरा संपन्न)

सांगली – ज्योती मोरे.

यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांना दिलासा देण्याकरिता म्हैसाळ टेंभू या योजनांची आवर्तने खासदार संजय काका पाटील यांनी उपसा बंदी असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सुरू ठेवली होती त्यानंतर थोडाफार प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते सध्या पुन्हा शेतकऱ्यांना काही अडीअडचणी आहेत का? तसेच पाणी योजनांची सद्यस्थितीतील कामे व आणखी काही ठिकाणी करावी यायला लागणाऱ्या उपाययोजना याबाबत खासदार संजयकाका पाटील युवा नेते प्रभाकरबाबा पाटील यांनी दुष्काळी तालुक्यात दौरा आयोजित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याकरिता कवठेमहांकाळ तालुक्यातील गावांचा मॅरेथॉन दौरा सुरू आहे. यातून शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,खासदार श्री संजय काका पाटील लोकसभा सदस्य सांगली यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या विविध भागांना भेट दिली. सध्या दोन्ही योजनांच्या सुरू असलेल्या आवर्तनाचा आढावा घेतला. म्हैसाळ योजने मधून दोन टीएमसी पाणी उचलून मिरज, कवठेमहांकाळ,जत,सांगोला, मंगळवेढा व तासगाव तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी देण्यात आले आहे. योजनेद्वारे मिरज तालुक्यातील एकूण लाभ क्षेत्रातील 188 तलाव / बंधाऱ्यांपैकी 122 तलाव /बंधाऱ्यांना, कवठेमंकाळ तालुक्यातील योजनेच्या लाभ क्षेत्रातील 88 तलाव/ ओढ्यावरील बंधाऱ्यांपैकी 62 पाणीसाठ्यांना म्हैसाळचे पाणी देण्यात आलेले आहे. तसेच तासगाव तालुक्यातील मनेराजुरी साठवण तलाव अंजनी ल. पा. तलाव व प्रमुख ओढ्यांवरील बंधाऱ्यांना म्हैसाळचे पाणी देणे प्रगतीत आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील तलाव बंधारे यांना दिलेल्या पाण्याबाबत खासदार श्री संजयकाका पाटील यांनी समाधान व्यक्त केले. योजनेसाठी काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

कवठेमंकाळ तालुक्यातील मौजे रांजणी येथील मार्गाची वाडी व गाव ओढ्यावरील बंधारे भरून देण्यासाठी असलेल्या अस्तित्वातील वितरण व्यवस्थेची पाहणी केली. या तलावाला व ओढ्यावरील बंधाऱ्यांना लवकरात लवकर पाणी देण्याच्या दृष्टीने म्हैसाळ योजनेच्या कवठेमहांकाळ कालव्याच्या अंत्यवितरीकेला जत रोड जवळ नवीन विमोचक बांधून त्यामधून या तलाव व ओढ्याला पाणी देण्याबाबत सूचना अधिकाऱ्यांना केल्या.तसेच मौजे अलकुड एस येथील गावाच्या पूर्वेकडून जाणाऱ्या ओढ्याला टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना माननीय खासदार साहेबांनी केल्या.

गोरडवाडी तलाव व गिरगोळ तलाव येथे पाण्याचा अपव्यय टाळणेकरिता अतिरिक्त थेट पाईपलाइन करणेच्या सुचना खासदार महोदयांनी दिल्या. तसेच मौजे अलकुड गावठाण जवळील क्षेत्र हे टेंभु अथवा म्हैसाळ योजनेमधुन ओलिताखाली आणण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करणेच्या सुचना मा खासदार महोदयांनी दिल्या.मौजे रांजणी मधील १७ बंधारे हे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये असुन यापैकी ३ बंधाऱ्यांना थेट भरण नलिका देण्यात आली आहे. परंतु या नलिका कमी व्यासाच्या असल्याने बंधारे भरणेकरिता थेट नलिका देणेबाबत प्रस्ताव करणेच्या सुचना मा खासदार महोदयांनी दिल्या. रांजणी वितरिका वरिल शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व क्षेत्रीय परिस्थितीनुसार अतिरिक्त आउटलेट देणेबाबत व सुभेदार वस्तीवरील लाभक्षेत्राकरित अतिरिक्त फीडर देणेबाबतच्या सुचना मा खासदार महोदयांनी दिल्या.करलहट्टी गावातील पांढरे वस्ती कडील भागाकरिता टेंभू योजनेची अतिरिक्त एक किलोमीटरची बंदिस्त नलिका देण्याबाबत खासदार महोदय यांनी अधीक्षक अभियंता यांना सूचना केल्या.

तसेच शेजोळे वस्ती व बाळूमामा मंदिराकडे जाणारी बंदिस्त नलिका करलहट्टीच्या ओढ्यापर्यंत बंधारे भरणे करिता वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना खासदार महोदयांनी दिल्या. तसेच काही ठिकाणी आउटलेट मागणी असलेल्या ठिकाणी क्षेत्रीय परिस्थितीनुसार योग्य ती कार्यवाहीयाच्या सूचना माननीय खासदार महोदयांनी दिल्या. कोकळे येथील गुरव तलाव येथे टेंभू योजनेतून टंचाई मधून सोडलेल्या पाण्याची पाहणी माननीय खासदार महोदयांनी टेंभू योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत केली.सदर तलाव टेंभू योजनेमधून 30 टक्के भरलेला असून भरलेल्या पाणीपट्टीमधून उर्वरित पाणी देणेबाबतच्या सूचना खासदार महोदयांनी अधीक्षक अभियंता यांना दिल्या, तसेच गुरव तलावा करिता व इतर कोकळे भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार थेट बंदिस्त नलिका वाढवणे बाबत संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना खासदार महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मौजे बसप्पावाडी येथील टेंभू योजनेमधून पाणी सुरू असलेल्या माळी तलाव येथे खासदार महोदय यांनी पाहणी केली उपस्थित शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे व माळी तलाव बिचुकले तलाव व जानकर तलाव यांची व्याप्ती पाहता तलावाकरिता अतिरिक्त आवश्यक व्यासाची नलिकाबाबत प्रस्ताव करणेबाबत सूचना खासदार महोदयांनी अधीक्षक अभियंता यांना दिल्या. तसेच मोघमवाडी येथील नाला बंडिंग करिता बंदिस्त नलिका देण्याबाबतच्या सूचना खासदार महोदय यांनी दिल्या. केरेवाडी येथील शेतकऱ्यांनी खासदार महोदय यांना टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करणे बाबत आग्रही मागणी केली. त्या अनुषंगाने खासदार महोदय यांनी तात्काळ टप्पा ४ टप्पा५ सुरू करून आवर्तन टेल टू हेड राबवणे बाबत अधीक्षक अभियंता यांना सूचना दिल्या.

आरेवाडी येथील बाळूमामा मंदिर बनाच्या पाठीमागील तलाव हा टेंभू योजनेमधून वंचित असले बाबत आरेवाडी येथील शेतकऱ्यांनी खासदार महोदय यांची भेट घेतली त्या अनुषंगाने सदर क्षेत्राचे सविस्तर सर्वेक्षण करणेबाबत च्या सूचना माननीय खासदार महोदयांनी अधीक्षक अभियंता यांना दिल्या. ढालेवाडी गावाच्या उत्तर भागातील क्षेत्रासाठी टेंभू उपसा सिंचन वरील ढालगाव वितरिकेवरून पाणी देण्याच्या बाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता यांना खासदार महोदय यांनी दिल्या.

कवठेमहांकाळ कालव्यावरील ढालगाव वितरिकेचे लाभक्षेत्र विकास कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे खासदार महोदय यांच्याकडून क्षेत्रिय अधिकारी यांना सूचना दिल्या, तसेच ढालगाव वितरिकेवरील ढोलेवाडी लघु वितरिकेवरून ढालगाव गाव तलाव मध्ये पाणी सोडण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाईपची मागणी शेतकऱ्यांनी केली याबाबत खासदार महोदय यांनी अधीक्षक अभियंता यांना तलाव भरण्यासाठी आवश्यक व्यासाच्या पाईप लाईन करण्याच्या सूचना दिल्या. ढालगाव गावातील घोदे वस्ती तलाव च्या पश्चिमेस शंभर एकर क्षेत्र वंचित राहिले असल्याचे व सदर भागासाठी सर्वेक्षण करून लाभक्षेत्र विकास कामामधून पाणी देण्याचे सूचना माननीय खासदार महोदय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जाधववाडी तालुका कवठेमहांकाळ येथे ओढ्यावरील दिलेल्या पाण्याचा आढावा खासदार साहेबांनी घेतला. काही शेतकऱ्यांनी कालव्यावरील उर्वरित लघुवितरिकेची कामे व लाभक्षेत्र विकासाची बंदिस्त नलिकेमधील कामे लवकरात लवकर करून घेण्याच्या सूचना केल्या.

लांडगेवाडी तलावास साठी वळण बंधाऱ्यातून निघणाऱ्या कालव्याचे काम बंदिस्त नलिकेमध्ये रूपांतरित करणे बाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना खासदार साहेबांनी केल्या.मौजे मळणगाव येथील अग्रणी नदीवरील उपबंधारे म्हैसाळच्या पाण्याने भरलेले पाहून खासदार साहेबांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अग्रणी नदीतील मौजे मोरगाव बंधारा क्रमांक एक पर्यंतचे सर्व बंधारे म्हैसाळच्या पाण्याने भरलेले आहेत तसेच योजनेचा विसर्ग वाढल्यानंतर व कालव्यांवरील आवर्तन पूर्ण झाल्यावर मौजे हिंगणगाव व पुढील बंधारे म्हैसाळच्या पाण्याने भरून देण्याचे सूचना केल्या.मौजे मळणगाव मधील वंचित क्षेत्रात पाणी देण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्वे करण्याच्या सूचना दिल्या.

या संपूर्ण दौऱ्यात खासदार यांच्या सोबत अधीक्षक अभियंता श्री.पाटोळे साहेब, कार्यकारी अभियंता श्री कोरे साहेब, कार्यकारी अभियंता श्री रेड्डीयार साहेब, श्री. अश्विन कर्नाळे, श्री मनोज कर्नाळे, श्री सुशील गायकवाड, अमित डवरी, उप अभियंता श्री. यादव, श्री. धनवडे हे उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: