Friday, October 18, 2024
Homeराज्यसूक्ष्म नियोजनातून गोंदियाच्या विकासासाठी खासदार प्रफुलभाई पटेल कटिबद्ध - माजी आमदार राजेंद्र...

सूक्ष्म नियोजनातून गोंदियाच्या विकासासाठी खासदार प्रफुलभाई पटेल कटिबद्ध – माजी आमदार राजेंद्र जैन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

(गोंदिया) खासदार प्रफुलभाई पटेल यांनी नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून विकासाची कामे केली आहेत. गोंदिया मेडिकल कॉलेज इमारतीचा बांधकामाला लवकर सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत. बिरसी विमानतळ वरून नियमित विमान सेवा सुरु होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला व व्यापाऱ्याला चालना मिळेल.

शेतकरी व विकासाकरिता व शहरातील विविध समस्याना प्राधान्याने सोडविणासाठी पूर्ण प्रयत्न करू, खासदार प्रफुलभाई पटेलजी यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करणे, गोंदिया शहरातील अनेक समस्या मार्गी लावून विकासाच्या प्रवाहात आणणे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले.

न्यू यंग बॉय मंडई मेला द्वारा व स्व. नारायणजी शेंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे, मरारटोली, गोंदिया येथे दिवाळीच्या पावन पर्वावर मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मंडईच्या यशस्वी आयोजना बद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

यावेळी राजेंद्रजी जैन, सचिन शेंडे, नरेश चौधरी, अखिलेश सेठ, केतन तुरकर, सुनील भालेराव, खेमराज शेंडे, व्यंकट पाथरू, बबली चौधरी, चंद्रकुमार चुटे, आशीष धार्मिक, लखन बहेलिया, रौनक ठाकूर, सोनु मोरकर, राजु लिमये सहीत मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: