धीरज घोलप
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी मंगळवारी मध्य रेल्वेच्या डीआरएमसोबत रेल्वे स्थानकांवर रेल प्रवासियांची सुविधा वाढविण्यासाठी होत असलेल्या विकासकामे आणि रेल्वे ओव्हर ब्रिज/ अंडर ब्रिज/ फूट ओव्हर ब्रिजच्या कामांबाबत बैठक घेतली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
सर्वप्रथम कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अप आणि डाऊन दिशेने भांडुप स्थानकावर थांबा देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याशिवाय (२) विद्याविहार स्थानकावर बांधण्यात येत असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाची अद्ययावत माहिती घेऊन गर्डर टाकण्याचा विषय (३) विद्याविहार स्थानकावरील सध्याचे एस्केलेटर बदलून नवीन एस्केलेटर बसवणे (४) घाटकोपर रेल्वे स्थानकावरील लोकांच्या सोयीसाठी एलिव्हेटेड स्टेशन डेकचा बांधकाम (५) सीएसएमटी बाजूच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर MRVC च्या कामामुळे बंध केलेल्या उपनगरीय तिकीट खिडकीसाठी पर्यायी व्यवस्था करणे.
या विषयावर प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याने विलंब न करता या विषयावर व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (६) विक्रोळी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाची स्थिती आणि गर्डर टाकण्याचा विषय (७) विक्रोळी स्टेशनवर मंजूर तीन एस्केलेटर आणि दोन लिफ्टच्या कामाची स्थिती आणि एटीव्हीएम बसवणे (८) विक्रोळी स्टेशनवर सीएसएमटीचा दिशेने तिकीट खिडकी आणि शौचालये निर्माण करण्याचा विषय (९) कांजूरमार्ग पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बांधकामाचा विषय (१०) जय हिंद मिल जवळ भांडुप पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या फूट ओव्हर ब्रिजचा विषय (११) भांडुपचा रेल्वे ओव्हर ब्रिजचा विषय (१२) नाहूरच्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या रुंदीकरणाच्या कामाची अद्ययावत माहिती,
या कामासाठी रेल्वे ब्लॉक आणि गर्डर टाकण्याची तारीख (१३) मुलुंड रेल्वे स्टेशन (पूर्व) येथे प्रस्तावित एस्केलेटर/लिफ्टच्या विषय (१४) अपना बाजार जवळील मुलुंड पूर्व आणि पश्चिमला जोडणारे अंडर ब्रिजचा विषय (१५) मुलुंड, भांडुप, घाटकोपर, गोवंडी आणि मानखुर्द स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी कामांना गती देण्याचा विषय (१६) गोवंडी आणि मानखुर्द स्थानकावर एस्केलेटर/लिफ्टच्या विषय (१७) मानखुर्द चे लालूभाई कंपाऊंड जवळ फूट ओव्हर ब्रीजचा विषय (१८) मुलुंड, नाहूर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, गोवंडी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांची गर्दी कमी करण्यासाठी या स्थानकांच्या प्रवेशद्वारांवरील बेकायदा फेरीवाले हटवणे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती.
ह्या बैठकीत मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेचे महत्त्वपूर्ण अधिकारी उपस्थित होते. हे सर्व अधिकाऱ्यांना आपसात समन्वय साधून लोकांची सुविधा वाढवणारे हे कार्य विना विलंब करण्यात यावे असे निर्देश खासदार मनोज कोटक यांनी दिले.