नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड शासकीय रुग्णालयात 35 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हिंगोलीचे खासदार तथा शिवसेनेचे (शिंदे गट) नेते हेमंत पाटील यांनी आज मंगळवार रोजी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा दिला असून खा. हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. वाकोडे यांना रुग्णालयातील शौचालय साफ करण्यास लावले.
खा. हेमंत पाटील यांनी आज शासकीय रुग्णालयात आल्यानंतर संपूर्ण रुग्णालयाचा आढावा घेतला. गंभीर रुग्णांना भेटून धिर देत विचारपूस केली. अधिष्ठाता (डिन) वाकोडे यांच्या काँबिनसह रुग्णालयातील टॉयलेट तुबंल्याचे खा. हेमंत पाटील यांना आढळून आले.
यानंतर अधिष्ठाता वाकोडे यांच्या हाती झाडू देऊन टॉयलेट साफ करुन घेत रुग्णालयातील अस्वछतेकडे वाकोडेंची लक्ष वेधले. खा.पाटील ही प्रसारमाध्यमांना बोलताना वाकोडे सोबत होते. तरीही त्यांच्या तोंडावर वाकोडेच्या गलथान कारभाराचा पाढा वाचत, वाकोडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे खा. हेमंतभाऊ पाटील यांनी सांगितले.