कल्याण / प्रफुल्ल शेवाळे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याकडे जाणारी वाट आता काही बिकट झाली आहे… कल्याण नगर या मार्गांवर मढ पारगाव ते माळशेज घाट रस्त्याची अवस्था खूप खराब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जुन्नर आंबेगाव रहिवासी संघांचे संस्थापक सदस्य आणि कल्याण डोंबिवली परिसरातील संदीप नलावडे यांनी सदर विषयाला हात घालत तालुक्यातील स्थानिक लोक प्रतिनिधी मार्फत यावर काही ठोस मार्ग निघत नसल्याने फेसबुक वर एक पोस्ट टाकली आहे…आणि त्यांनी शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना एक पत्र लिहून सदर रस्ता दुरुस्त व्हावा अशी विनंती केली आहे.
असं असताना जुन्नर तालुक्यात कोणी विरोधक तरी शिल्लक राहिलाय का.. असा उपरोधिक टोला लगावत नाराजी व्यक्त केली आहे.. यावर शिरूर लोकसभा खासदार – (पुणे ग्रामीण ) डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यला एक पत्र लिहलं शेतकऱ्यांना भूसंपादन बाबत मोबदला मिळाला आहे की नाही अशी विचारणा केली आहे… त्या अनुषंगाने रस्ता सोईस्कर व्हावा याकरिता पुढे प्रयत्न करता येतील असं खासदार डॉ. कोल्हे यांनी नमूद केलं आहे.
शिवनेरी किल्ल्यावर तसेच माळशेज घाटातून पुण्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.. परंतु रस्त्याची दुरावस्था यामुळे खाजगी वाहन चालक, इतर वाहन चालक हताश होताना दिसून येत आहे.. जुन्नर आंबेगाव रहिवासी संघांचे टिटवाळा परिसरातील सदस्य दशरथ दांगट..
शेखर वाकोडे, विशाल साळुंखे, सोनाली पोटे यांनी लोकप्रतिनिधीनी अग्रेसर होऊन सदर विषय मार्गी लावणं गरजेचं असल्याचे म्हटलं आहे.. सदर पोस्ट फेसबुक वर पाहता नेटकऱ्यानी खराब रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत भविष्यात रस्ता रोको आंदोलन करावे लागतील असं म्हटलं आहे… परंतु आज सुद्धा शिवनेरी किल्याकडे जाणारी वाट ही बिकट आहे असेच म्हणावं लागेल.