Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहाविकासाच्या आघाडीतून विधानसभे करिता खासदार "बाळ्या मामा" (सुरेश म्हात्रे) आग्रही…

महाविकासाच्या आघाडीतून विधानसभे करिता खासदार “बाळ्या मामा” (सुरेश म्हात्रे) आग्रही…

ठाणे जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या वळणावर…..

ठाणे – प्रफुल्ल शेवाळे

लोकसभा निवडणूकीत भाजपा चे माजी पंचायतराजमंत्र्याचा झालेला पराभवाने मुरबाडच्या विधानसभेची दिशा नव्हे तर दशाच बदलून टाकली गेली आहे.येथील राजकारणाचा आरंभ आणी प्रारंभाचा रंगच बदलताना दिसून येत आहे.या लोकसभेसाठी सहा विधानसभा येत असल्या तरी कायम लोकांची घर फोडणाऱ्या भाजपाला मुरबाड तालुक्यात मात्र आपल्याच पक्षातील फुटीचा सामना करावा लागतोय भाजपातील आमदार- पंचायराजमंत्र्यातील फुटीचा व राजकीय वैमन्याशाचा फायद्या सोबत ग्रामिण भागात भाजपा कडे आपला हक्काचा असा मतदार नाही.

जूमला विकासाला विटलेली आम जनतेने लोकसभेत खा.बाळ्या मामा व अपक्ष उमेदवाराला मिळालेला प्रंचड प्रतिसाद पाहता,विधानसभेला बदल होणार हे लोकसभेच्या आकडे वरीने चित्रच स्पष्ट झाल्याचा फायदा मिळविण्यासाठी बदलापुर-मुरबाड शिंदे गट येथील आमदार पाडायचा नाही तर “गाडायची” तयारी करीत आहेत.तर जिजाऊ चे अपक्ष उमेदवारांनी देखील तयारीला लागले असतांनाच महाविकास आ़घाडीच्या वाट्याला हि जागा असल्याने हि जागेवर दावा नाही तर आमचाच उमेदवार असेल व तो बहूतमाने विजयी होण्याची खात्री देत हि जागा लढविण्याचा निश्चय झाल्याचे खा.बाळ्यामामा याने सांगितले.

मुरबाड तालुक्याचा विकास साधायचा असेल तर कल्याण मुरबाड रेल्वेमार्ग होणे आवश्यक आहे.या मतदार मतदारसंघाचा विकास झाला नाहीच उलट काँग्रेसच्या काळात मुरबाडच्या तरुणांच्या हातात काम मिळाले पाहिजे म्हणून औद्योगिक क्षेत्र मुरबाड मध्ये आणले.परंतु यांच्या कर्तबगारीमुळे मुरबाड एमआयडीसीला घरघर लागल्याचा आरोप केला.

मुरबाड तालुक्यातील प्रलंबित विकास कामे,कल्याण मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्ग,अनेक विकासात्मक कामे न करताच काढलेली बिल,काँग्रेसने मुरबाड तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आणलेली एम.आय.डीसी.ला लागलेली घरघर या मतदारसंघाचा विकास रखडल्याचा आरोप खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी करीत आपल्या विजयात कुणाचा हात नाही कोणत्याही अदृश्य शक्तीने मला सहकार्य केले नाही.तसे असते तर कपिल पाटील आणि निलेश सांबरे यांना मुरबाड मतदारसंघात वाढीव मतदान झाले असते का.

त्यामुळे गेले अनेक दिवस आमदार किसन कथोरे यांनी बाळ्या मामा यांना मदत केली असल्याच्या चर्चेला बाळ्यामामा यांनी पूर्ण विराम दिला व सोबत मुरबाड विधानसभा ही राष्ट्रवादिच्या वाट्याला असल्याने दावा करणार व बहूनताने विजयी करणार असल्याचा मनोदय व्याक्त केल्याने मुरबाडच्या राजकारणाची दिशा नव्हे तर दशा होत राजकारणाचा आरंभा व प्रारंभाचा रंग बदलूलागला आहे.एकंदरीत ठाणे जिल्यातील राजकारण एका वेगळ्या वळणावर चाललंय असं म्हणावं लागेल.

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: