अकोला-पंढरपूर-अकोला विशेष गाडी
अकोला :- सनातन धर्माची पताका वारकऱ्यांनी हजारो वर्षांपासून कायम ठेऊन संस्कृती संवार्धानासोबत, संस्कार, मानवता, सर्वांच्या कल्याणाची कामना करणारा संप्रदाय आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने येथे जात असतो त्यांचे साठी सुविधा उपलब्ध करून देणे सद्याच्या धक्धाकीच्या व धावपळीच्या काळामध्ये श्रद्धा आणि भक्तीचे प्रतिक श्री क्षेत्र पंढरपूर दर्शनासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून अकोला –बुलढाणा-वाशीम- हिंगोली- अमरावती जिल्ह्याला लाभदायक व कमी खर्चात रेल्वेचा लाभ घेणारे वारकरी व सातत्याने वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा आशीर्वाद हीच आपली शक्ती असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
स्थानिक रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ६ येथून अकोल्यात प्रथमच खासदार अनुप धोत्रे यांचे पाठपुराव्यामुळे अकोला पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवतांना व उन्मेष मालू व भाजपा तर्फे वारकऱ्यांना विविध वस्तू, जलपान, फराळ वाटप करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील हे होते तर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जयंत मसने, विजय अग्रवाल, वसंत बाछुका. गिरीश जोशी, उन्मेष मालू, सुभाष सिंग ठाकूर, माधव मानकर, कृष्णा शर्मा,
संजय गोटफोडे, संजय इंगळे, संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करीहार, अनिता चौधरी, रमेश करिहार, राहुल देशमुख, राजेंद्र गिरी धनजंय धबाले , अक्षय जोशी, हरिभाऊ काळे, प्रशांत अवचार, सौ सुमन गावंडे सौ. चंदा शर्मा, सौ आरती घोगलिया, दिलीप नायसे, प्रकाश घोगलिया बबलू पळसपगार उमेश श्रीवास्तव गोपाल मुळे कुलदीप दुबे सुनील बाठे अमोल मोहोकार अमोल गीते हेमंत शर्मा नितेश पाली ना अतुल गोमासे मनोज साहू, सुरेंद्र चव्हाण, विक्की ठाकुर, रुपेश जयस्वाल, हरीश काळे, प्रकाश घोगलिया सूगत गवई, उमेश श्रीवास्तव,
कपिल बुंदेले, राजेश चौधरी, सचिन आयवडे, राजू उदापुरे राजु परवते, सौ अनिता चौधारी, सौ सुषमा शुक्ला सौ गायत्री शुक्ला ॲड दांदळे, सागर शेगोकार, गणेश तायडे, विपूल घोगरे, युवराज दांदळे, गोपाल पारधी, आदी उपस्थित होते. या वेळी नगर सेविका अनिता चौधरी यांनी वारकऱ्यांची औक्षवण व रांगोळी काढून स्वागत केले.
या वेळी २१ वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले या मध्ये साहेबराव वहिले, शंकरराव काकड, दिलीप खेडकर, पुर्नाजी खेडकर, गुणवंत देशमुख, मुरलीधर राऊत, मेघा प्रधान, देवकाबाई ठाकरे, बाळकृष्ण वाडे, गणेश चिंचोलकर, मंचित स्वामी, गजानन ठाकरे,नंदू भाऊ वाघोडे, दिलीप भुरे, रवींद्र कुलट, रामदास साबळे, देवानंद इंगळे, माधुरी देशमुख तसेच रेल्वे चालक रोचन गोलाईत, बदल चव्हाण यांचे स्वागत व सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
पंढरपूर ला जाणाऱ्या ५ स्पेशल गाड्या व २४२ बसेस सोडून वारकऱ्यांचा सन्मान व महामंडळ स्थापना करून शासन हे संस्कृती जतन करणारे – आमदार रणधीर सावरकर
१३ कोटी महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत विठ्ठल रुख्मिणी व जगातील सर्वात मोठी वारी पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वातात खासदार अनुप धोत्रे यांनी पाच गाड्या सुरु केल्या आहेत. तसेच २४२ वसेस ४० प्रवासी असलेतर थेट पंढरपूर यात्रा घडविण्याची सुविधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नेतृत्वात उपलब्ध करून देण्यात आल्या तर वारकरी महामंडळ व जेष्ठांसाठी वयोश्री श्री योजना व लाडकी बहिण योजना सुरु करून व मुलींकरिता सर्व क्षेत्रात मोफत उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊन हा महाराष्ट्र संत महात्मा आणि पुरोगामी फुले आंबेडकर –अहिल्या बाई होळकर,
मा जिजाऊ शाहू महाराज यांना मानणारा असल्याचे कृतीने सिद्ध केले असे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. या वेळी आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली. जय श्रीराम, संत गजानन महाराज की, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज यांचा जय जय कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी तर प्रास्ताविक उन्मेष मालू तर आभार प्रदर्शन जयंत मसने यांनी केले.विशेष गाडी क्रमांक ०७५०६ चा परतीचा प्रवास पंढरपूर येथून १७ जुलै रोजी रात्री ९ वाजता सुरू होईल.