Sunday, December 22, 2024
Homeखेळखासदार क्रीडा महोत्सव मध्ये प्रो पंजा क्रीडा स्पर्धेत मोवाड भूषण मंगेश डफरे...

खासदार क्रीडा महोत्सव मध्ये प्रो पंजा क्रीडा स्पर्धेत मोवाड भूषण मंगेश डफरे यांना कांस्य पदक…

नरखेड – अतुल दंढारे

नागपूर येथे सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव 2023 प्रो पंजा क्रीडा प्रकारात मोवाड येथील मंगेश डफरे मोवाड भूषण पुरस्कार प्राप्त यांनी ९० किलो वजन गटात प्रतीस्पर्धि ला पराभूत करून कांस्य पदक प्राप्त केले. हिंदी फिल्म अभिनेत्री प्रिती झिंगयांनी यांच्या हस्ते पदक स्वीकारताना य़ा आगोदर मंगेश नी भारोत्तलन मध्ये राष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे . त्याने स्वता अकादमी स्थापन करून मुलाना फ्री मध्ये प्रशिक्षण देऊन आज़ ते विद्यार्थी क्रीडा प्रकारात प्रावीण्य प्राप्त करून नोकरीवर आहे.

यासाठी मंगेश ला मोवाड भूषण गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. गावातून त्याचा सर्व पातळीवर अभिनंदन वर्षाव होत॑ आहे. गावातील माजी नगराध्यक्ष , माजी नगरसेवक व शिक्षक , पत्रकार व सर्वच क्षेत्रातील खेळाडू त्याच अभिनंदन करतं आहे. नरखेड तहसील मधून एकमेव कांस्य पदक प्राप्त खेळाडू आहे. मंगेश ने आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांसह पुलगाव डेपोचे वरिष्ट अधिकारी व आपल्यां मेहनतीला दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: