मुंबई – गणेश तळेकर
दि. 24 जुलै रोजी आझाद मैदान येथे शिवस्मारकाच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेले जागर गोंधळ शिवस्मारकाचा आंदोलन यशस्वी झाले आहे. तमाम शिवभक्तांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यांनी आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अस्मितेचा आणि आस्थेचा आवाज बुलंद केला. आंदोलनाच्या निमित्ताने महायुती सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी या आंदोलनाची दखल घेतली. जय शिवसंग्राम संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन सादर करणार आहेत. या निवेदनात शिवस्मारकाच्या उभारणीसाठी व प्रकल्पाच्या गतीसाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.
जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राम हरी मेटे साहेब, प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते श्री दीपक दत्ताराम कदम, श्री आकाश जाधव संपर्कप्रमुख महाराष्ट्र, श्री शशिकांत शिरसेकर मुंबई प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ. प्रवीणा सावंत, महिला अध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश, श्री राजेश कदम, सरचिटणीस, मुंबई प्रदेश, सौ अमिता कदम, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष , श्री सचिन गायकवाड, महाराष्ट्र अध्यक्ष, चित्रपट सांस्कृतिक आघाडी, श्री राजेंद्र सावंत, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र, चित्रपट सांस्कृतिक आघाडी यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनामुळे शिवस्मारकाच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
शिवभक्तांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि या आंदोलनाच्या यशस्वीतेमुळे शिवस्मारकाच्या उभारणीसाठी आणखी एक नवी दिशा मिळाली आहे. स्व. विनायकराव मेटे साहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी हा मोठा टप्पा गाठला गेला आहे.