मुंबई – राज्यातील पर्यटन वृध्दी होऊन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लि (NHLML) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर हा करार करण्यात आला.
या प्रस्तावित रोप वे मुळे पर्यटकांना महाराष्ट्रातील प्राचीन मंदिर, ऐतिहासिक स्थळे, निसर्ग रम्य ठिकाणे आदि ठिकाणे जाणे अधिक सोयीचे व सोपे होणार आहे. काही ऐतिहासिक पर्यटन ठिकाणे, प्राचीन मंदिरे ही उंच ठिकाणी आहेत , तेथे पायी जाणे कठीण आहे , त्यामुळे तेथे पायी चालत जावे लागत आहे,यामुळे पर्यटकांना त्या ठिकाणी जाणे जिकारीचे व्हायचे पण आता रोप वे मुळे पर्यटकांना चांगली सुविधा मिळणार आहे.
महाराष्ट्रात प्राथमिक टप्प्यात रोप वे करीता ४० ठिकाने निश्चित करण्यात आली आहेत. या ४० ठिकाणचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लि च्या सामंजस् यकरारामुळे पर्यटनाला चालना मिळेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल