Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीनरखेड पोलीसांकडुन मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश...

नरखेड पोलीसांकडुन मोटर सायकल चोरांचा पर्दाफाश…

पोलीस स्टेशन नरखेड नागपुर (ग्रा) येथील गुन्हे प्रकटीकरण पथक हे मागील काही दिवसा पासुन मा. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीबाबत अज्ञात आरोपीचा शोध घेत असता
मिळालेल्या माहीतीवरुन मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे जेल बंद असलेले आरोपी क्र. 1) प्रमोद उर्फ पिंटु केशवराव राऊत वय 34 वर्ष रा. पेठबुधवार काटोल ता. काटोल, जि- नागपुर ह. मु. पठार 2) मयुर माधवराव युवनाते वय 22 वर्ष 3) अजय धुरेसिंग परतेती वय 25 वर्ष दोन्ही रा. उमरखेड ता. मोर्शि जि- अमरावती

4) विवेक सुधाकरराव भुजाडे वय 31 वर्ष रा. हिवरखेड ता.मोर्शि जि- अमरावती याचा ताबा घेवुन त्याचेकडे पोलिस कोठडी दरम्यान कौशल्यपुर्ण तपास करुन नरखेड तसेच ईतर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील दोन वर्षात चोरी झालेल्या मोटर सायकली आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या असुन त्यामध्ये एकुण वेगवेगळ्या कंपनीच्या 07 मोटर सायकली किमंती अंदाजे एकुण किमंती 2,34,000/रुपयाचा माल हस्तगत करण्यात नरखेड गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलेले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. विशाल आनंद सा., पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा), डॉ. संदिप पखाले, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर (ग्रा), श्री. नागेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल विभाग, श्री जयपालसिंह गिरासे, ठाणेदार, नरखेड याचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि हरिषचंद्र गावडे, पो.ना. कैलास उईके, पो. शि राजकुमार सातुर, गौरव बखाल, कैलास टेकाडे यांनी पार पाडली करिता सदरची बातमी वृत्तपत्रात प्रसारित करण्यास विनंती आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: