सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील अंकले गावात ऊस तोडणी वर असलेल्या राहुल गोविंदा चव्हाण वय- 21 वर्षे, राहणार- पांडोझरी,
तालुका- जत यास अंकले ते डोर्ली रस्त्यावरील आदिनाथ मच्छिंद्र जाधव यांच्या शेतात छापा मारून ताब्यात घेतले. त्याच्या पाला जवळ दोन मोटरसायकली मिळून आल्या. या गाड्यांविषयी चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली.मात्र नंतर MH-10 AD 1080 ही मोटरसायकल सांगलीतून सात ते आठ दिवसांपूर्वी चोरल्याचे सांगितले. बिना नंबर प्लेटची गाडी माळशिरस इथून चोरल्याचे सांगितले.
या दोन्ही मोटर सायकल विषयी माळशिरस आणि सांगली शहर पोलीस खात्री केली असता दोन्ही गाड्यां विषयी गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रीम निओ तर 20 हजार रुपये किमतीची फॅशन प्रो असा,एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपीसह मुद्देमालासह पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, राजेश शिरोडकर, जितेंद्र जाधव,राहुल जाधव,अजय बेंद्रे,संदीप पाटील, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम,कॅप्टन गुंडवाडे, दीपक कांबळे आदींनी केली.