Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मोटरसायकल चोरास कुपवाड मधून अटक - एक लाख...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मोटरसायकल चोरास कुपवाड मधून अटक – एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त…

सांगली – ज्योती मोरे

सांगली परिसरातून मोटरसायकली चोरणाऱ्या दिनेश अशोक पाखरे वय 28 राहणार दिनकर चव्हाण यांच्या घरी स्वामीमळा एमआयडीसी कुपवाड तालुका मिरज या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बातमीदाराच्या माहितीनुसार छापा टाकून कुपवाड मधील स्वामी मळ्याच्या स्मशानभूमी जवळून ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने सांगली परिसरातून चार मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले आहे.

त्याच्याकडून सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत .मुद्देमालासह आरोपीस विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार ,प्रशांत माळी आर्यन देशिंगकर,सुधीर गोरे, राजू मुळे, ऋतुराज होळकर,सुनील जाधव, विनायक सुतार, शुभांगी माळी आदींनी केली आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: