सांगली – ज्योती मोरे.
पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी विविध गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार करून तपास सुरू केला असता, कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग साठी पाठवल्यानंतर पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदारांने चोरी केलेल्या मोटरसायकली शेतात कडब्याच्या गंजीजवळ लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानुसार,
पथकाने आरेवाडीतील बाल अपचारीच्या घरी जाऊन चौकशी केली असता ,विद्यानगर कवठेमंकाळ मधून स्प्लेंडर,लोणारवाडीतून रॉयल इन्फिल्ड बुलेट आणि खिळेगाव मधून स्प्लेंडर या गाड्या चोरल्याचे आणि त्या शेतात लपवल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, सदर मोटरसायकलींच्या बाबतीत गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार,त्यांच्याकडून एकूण दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास कवठेमंकाळ पोलीस ठाणे करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार,अमोल ऐदाळे,कुबेर खोत,आमसिध्द खोत,दीपक गायकवाड, बाबासाहेब माने,
अमर नरळे, संकेत मगदूम, पोलीस नाईक सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई अजय बेंद्रे, सुनील जाधव, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, पोलीस शिपाई चालक गणेश शिंदे, पोलीस नाईक कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील आदींनी केली आहे.