पातूर – निशांत गवई
पातूर नजीक असलेल्या खानापूर फाट्यावर एका दुचाकीला अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. आस्टूल कडून पातूरला येत असताना पातूरपासून 3 किमी अंतरावर असलेल्या खानापूर फाट्यावर भरधाव वेगाने येत असलेली दुचाकी रस्त्याच्या कडेवरून घसरल्याने दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने सदर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून अपघात झाला,यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
ही धडक एवढी जबर होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.सदर मृतक दुचाकीस्वार हा लक्ष्मण शामराव देवकर (वय अंदाजे 35) पांगराबंदी येथील असल्याची माहिती मिळाली. यावेळी पातूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतकास शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.