Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमोटर सायकल चोर जेरबंद - २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त -...

मोटर सायकल चोर जेरबंद – २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त – एक जण फरारी – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई…

सांगली – ज्योती मोरे

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला एका मोटरसायकल चोरास पकडण्यात यश आले आहे. त्याने मुंबई, पनवेल, ठाणे, अथणी, नवी मुंबई आदी भागातून अनेक मोटरसायकली चोरल्याचं सिद्ध झाले असून, हे सारे गुन्हे उघडकीस आले आहेत.ज्ञानू उर्फ देण्या अण्णाप्पा खोत राहणार पांडेगाव रोड, खोत मळा, कोंगनोळी, तालुका कवठेमंकाळ या आरोपीस अटक केली असून, विजय उर्फ सुनील बबन ऐवळे, राहणार हाटकरवाडी, कोगनोळी, तालुका कवठेमंकाळ हा आरोपी फरारी आहे.

दरम्यान वेगवेगळ्या गुन्ह्याची माहिती घेऊन ते उघडकीस आणण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कांबळे, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, सुधीर गोरे, राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ठोकळ, आर्यन देशींगकर, प्रशांत माळी हे मिरज उपविभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की,

ज्ञानू खोत याने सोनी तालुका मिरज सह अथणी जिल्हा बेळगाव आणि इतर ठिकाणाहून मोटरसायकली चोरून आणून त्या घराच्या मागच्या बाजूस लावले आहेत. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्यांच्याजवळ विना नंबर प्लेटच्या पाच मोटरसायकली असा एकूण 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल मिळून आला असून, या सर्व गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अच्युत सूर्यवंशी यांच्यासह टीमने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: