Saturday, December 21, 2024
Homeराज्यमाता न तूं वैरिणी...जन्मदात्या आईनेच घेतला चिमुकल्या मुलीचा जीव...अकोल्यातील धक्कादायक घटना...

माता न तूं वैरिणी…जन्मदात्या आईनेच घेतला चिमुकल्या मुलीचा जीव…अकोल्यातील धक्कादायक घटना…

अकोला : शहराच्या खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बलोदे लेआऊट मध्ये धक्कादायक घटना समोर आलीय, येथे एका महिलेने आपल्याच साडेपाच वर्षीय मुलीचा जीव घेतलाय. सदर घटनेचा उलगडा खदान पोलिसांनी केला आहे. मृत चिमुरडीच्या आई विजया हिला खुन प्रकरणात ताब्यात घेतले आहे. मृत मुलीचे नाव किशोरी असून तिचे वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किशोरीच्या आईच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नापासून पती पत्नी मध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील केली होती. आणि या वादात किशोरीचा बळी गेल्याचे प्राथमिक समजते. मृत मुलीने नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव आरोपी आईने केला होता. तसा संशयच किशोरीच्या वडीलांना होता. त्यांनी पोलिसांना या संशयाबद्दल अवगत केले होते. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीचे पोस्टमार्टम केले आणि तपासात अनेक नव नवे खुलासे समोर आले.

नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव आईने केला होता. पण, पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये या साडेपाच वर्षीय किशोरीच्या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणात आज खदान पोलिसांनी किशोरीची आई विजया हिला खुन प्रकरणात ताब्यात घेतले आहे. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचे केलेला देखावा समोर आला. तर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तर तिच्या अंगावर आणि शरीरात मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे अधोरेखित झाल्याचे चित्र होते.

या महिन्याच्या सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद किशोरीची घेतली गेली होती पण, पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणात किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदारयांनी दिली आहे.

या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीसनिरीक्षक धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, हेकाँ करंदीकर व पोलिस कर्मचारी आकाश राठोड काम पाहत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: