Thursday, September 19, 2024
Homeराज्यमाँ. कालंका मंदिर रामटेक ते वैष्णोधाम रामधाम मनसर पर्यंत भव्य पालखी पदयात्रा...

माँ. कालंका मंदिर रामटेक ते वैष्णोधाम रामधाम मनसर पर्यंत भव्य पालखी पदयात्रा…

रामटेक – राजु कापसे

नवरात्राच्या पावनपर्वा वर माँ कांलका मंदिर रामटेक ते वैष्णोधाम रामधाम मनसर येथुन पालकी पदयात्रा ही प्रथम रामटेक मधील अठराभुजा गणपती मंदिर मध्ये पुजा करुन पालकी ही माँ कांलका मंदिर कडे प्रस्थान करुन माता कांलका देवीचे पुजा अर्चना करण्यात आली. त्या नंतर पालकी ही मनसर येथील वैष्णोधाम रामधाम येथे आगमन झाले.

श्री. चंद्रपाल चौकसे (पर्यटक मित्र, संस्थापक रामधाम तीर्थ मनसर व सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर) यांनी पालखीचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

पालखीत सहभागी भक्तांनी माँ. वैष्णो देवीचे दर्शन घेतले. व सौ. संध्याताई चंद्रपालजी चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर) यांचे हस्ते महिलांना ओटी भरण्यात आली आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्थता केलेली होती.

श्री. प्रेमभाऊ रोडेकर यांचे अध्यक्षतेखाली भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी श्री. संजयजी सत्येकार, श्री. महेंद्रजी भुरे, श्री. पी.टी. रघुवंशी, बबलूजी दुधबर्वे, शोभाताई राऊत (माजी नगराध्यक्ष, रामटेक), ह.भ.प. पडोळे आई, कांचनताई माकडे, विमलताई नागपुरे, रंजनाताई मस्के, सुभाषजी नागपुरे, मोहन कोठेकर, अजय खेडगरकर,

तुळसाबाई महाजन, विमलताई वंजारी, सुषमा महाजन, विद्या महाजन, देविका हटवार, लक्ष्मी सावरकर, गजानन हटवार, देवाजी सत्येकार, रामदास नागपुरे, व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: