Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनपाच कोटींमध्ये बनवलेल्या 'या' बॉलीवूड चित्रपटाने केली परदेशात १०० कोटींची कमाई...कोणता चित्रपट...

पाच कोटींमध्ये बनवलेल्या ‘या’ बॉलीवूड चित्रपटाने केली परदेशात १०० कोटींची कमाई…कोणता चित्रपट ते जाणून घ्या

न्युज डेस्क – एक काळ असा होता की बॉलीवूडमधील चित्रपट 100 कोटी, 200 कोटी आणि अगदी 500 कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करत होते. मात्र गेल्या काही वर्षांत अशी निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे की, करोडोंच्या बजेटमध्ये बनलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्यांची सरासरीही काढू शकत नाहीत. बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत हीच परिस्थिती आहे. तर छोट्या बजेटचे चित्रपट आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत.

असाच एक चित्रपट आहे, जो अवघ्या 5 कोटींमध्ये बनला होता आणि त्याने परदेशात 100 कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही मोठी स्टारकास्ट नव्हती. सलमान खानच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदाच 100 कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला असला, तरी हा पराक्रम परदेशातील ‘मान्सून वेडिंग’ या छोट्या बजेट चित्रपटाने केला आहे. 2001 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट मीरा नायरने दिग्दर्शित केला होता.

पाच कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने परदेशात 100 कोटींची कमाई केली. ‘मान्सून वेडिंग’ हा पंजाबी लग्नावर केंद्रित असलेला कॉमेडी-ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, लीलेते दुबे, विजय राज, तिलोत्तमा शोम, शेफाली शाह आणि रणदीप हुडा यांसारखे कलाकार यामध्ये होते.

‘मान्सून वेडिंग’ ही एक इंडो-यूएस निर्मिती होती, जी यूएसए फिल्म्सने उत्तर अमेरिकेत वितरीत केली होती. नंतर या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार जिंकले. एवढेच नाही तर ‘मान्सून वेडिंग’ला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: