Monsoon Update : पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, देशात मान्सून दाखल होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार, यंदा मान्सून वेळेवर देशात दाखल होईल आणि यावेळी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या देशाच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. हैदराबादमध्ये काल जोरदार पाऊस झाला.
हवामान खात्याने अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय इतर राज्यातील लोक कडक उन्हाचा, आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. देशाच्या कोणत्या राज्यात मान्सून कधी दाखल होणार आहे ते जाणून घेऊया?
मान्सून कोणत्या राज्यात कधी दाखल होणार?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १९ मे रोजी मान्सून अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बेटांवर दाखल होईल. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल. 5 जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील निम्म्या राज्यांमध्ये मान्सूनचा प्रभाव दिसून येईल. 10 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यात मान्सूनचा पाऊस पडेल. 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून दाखल होईल.
🌧️ Exciting monsoon progress expected!
— 𝐃𝐫 𝐏𝐫𝐚𝐝𝐞𝐞𝐩 𝐊𝐮𝐬𝐡𝐰𝐚𝐡𝐚 (@pkusrain) May 16, 2024
– Andaman: 18-20 May
– Kerala & South India: 27 May-3 June
– Northeast India: 25 May-1 June
– Central India: 5-10 June
By June 25 monsoon likely to cover entire India.
Get ready for the rains! 🌦️ #Monsoon2024 #WeatherUpdate pic.twitter.com/CRFfK51TBq
उत्तर प्रदेशात २० जूनपर्यंत आणि कानपूर विभागात २८-२९ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 25 जूनपर्यंत मान्सून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 28 जूनपर्यंत मान्सून दिल्ली-एनसीआरमध्ये दाखल होईल. 30 जूनपर्यंत राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये मान्सूनचा प्रभाव दिसून येईल. 8 जुलैपर्यंत मान्सून देशभरात पसरेल. 15 सप्टेंबरपर्यंत मान्सून माघार घेईल.