सांगली – ज्योती मोरे.
जिल्ह्यातील विविध एसटी स्टँडवर पैशांसह दागिन्यांची चोरीचे प्रकार वाढत असल्याने याविषयी तपासाचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली सह अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिल्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास सुरू असतानाच खास बातमीदारांना दिलेल्या माहितीनुसार, वर्षा इकबाल लोंढे. वय वर्षे- 35, राहणार- तारदाळ, तालुका- हातकणंगले,
जिल्हा- कोल्हापूर आणि रुक्मिणी अरुण चौगुले. वय वर्षे -32, राहणार – इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली. या दोघींना चोरीतील दागिने विकण्यासाठी सांगलीतील शंभर फुटी वरील विद्युत केंद्राजवळ येणार असल्याचा समजताच,सदर ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांची महिला कॉन्स्टेबल कडून चौकशी करून झडती घेतली असता, त्यांच्या जवळील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले,
या दागिन्यांविषयी विचारणा केली असता. सदरचे दागिने हे मिरज सह तासगाव बस स्टँडवरून गर्दीत बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे चोरल्याचे त्यांनी कबूल केले. यामध्ये 4 लाख 46 हजार 500 रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिनांचा समावेश आहे. या दोघींपैकी वर्षा लोंढे ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या दोघींसह मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन साहेब, पोलीस निरीक्षक पंकज पवार,
पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंद्रे,सोमनाथ पतंगे, आमसिध्द खोत,सुशांत चिले, महिला हेड कॉन्स्टेबल रंजना कलगुटगी, शुभांगी मुळीक, सुनिता शेजाळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती चव्हाण, कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली आहे.