Monday, December 23, 2024
Homeराज्यअल्पवयिन मुलीचा विनयभंग शहरात तणावपूर्ण शांतता...

अल्पवयिन मुलीचा विनयभंग शहरात तणावपूर्ण शांतता…

आरोपी विरुद्ध पास्को सह गुन्हा दाखल

पातूर – निशांत गवई

पातूर शहरात काल रात्री तिन युवकांनि एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याने शहरात तणावपूर्ण शांतता असून सदर चि घटना 8 मे च्या रात्री साडे नऊ च्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील आपल्या नातेवाईकां कडे कार्यक्रम आटोपून घरी परत येत असलेल्या अल्पवयिन मुलीला शहरातील प्रवीण रामदास आमले,

सागर सूर्यभान उगले, व तुषार उगले यांनी संगणमत करून पीडित मुलीची पर्स पकडून अडवून प्रवीण आमले याने हात पकडला तर सागर उगले याने स्कार्फ ओढला तसेच तिच्या कडे मोबाईल नंबर चि मागणी करत असतांना पाठीमागून येत असलेल्या पीडिता चे नातेवाईक आले

असता तीनही आरोपीनी तेथून पळ काढला सदर घटनेमुळे घाबरून गेलेल्या पीडित मुलीने घडलेला घटनाक्रम घरी सांगितला असता सदर च्या घटने मुळे दोन्ही विभिन्न समाजातील नागरिक आमनेसामने येऊन शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असता घटने चि माहिती ठाणेदार हरीश गवळी यांना समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्या चा प्रयत्न करत होते

मात्र त्यांचे प्रयत्न व अपूर्ण पोलीसबळ पडत असतानी समयसूचकता दाखवत सहा. उपअधीक्षक मोनिका राऊत मॅडम उपविभागीय अधिकारी गोकुळराज, नायब तहसीलदार सैय्यद एहसानोद्दीन ठाणेदार संतोष महाले, बाळापूर चे ठाणेदार अनिल जुमले सह अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली होती तर अधिकारी आणि शहरातील अतिक पहेलवान पत्रकार दुले खान या सर्वांनी दोन्ही भिन्न समाजातील आक्रमक झालेल्या नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून आज शहरात तणावपूर्ण शांतता असून पीडित मुलीच्या वडिलांच्यातक्रारी वरून सागर सूर्यभान उगले, प्रवीण रामदास आमले,

तुषार उगले यांच्या विरुद्ध अप नंबर 230/23 भादवी 354,354ड 341,506 भादवी सह कलम 8,12 पास्को ऍक्ट नुसार गुन्हा दाखलं करण्यात आला असून तिन आरोपी पैकी सागर सूर्यभान उगले यास पातूर पोलिसांनी रात्रीच अटक केली असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून शहरातील हालचाली वर पातूर पोलीस लक्ष ठेवून आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: