Mohammed Shami : काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी झाला. या सामन्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळविला. आणि विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला. भारत विरुद्ध श्रीलंका, 33व्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या 55 धावांत गडगडला. अशा प्रकारे टीम इंडियाने या सामन्यात श्रीलंकेचा 302 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. भारताविरुद्धच्या आजच्या सामन्यात श्रीलंकेचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. श्रीलंकेच्या संघासाठी रजिथाने 17 चेंडूत 14 धावा, टेकशनाने 23 चेंडूत 12 धावा आणि मॅथ्यूजने 25 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले.
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पाच षटके टाकताना 18 धावा देत सर्वाधिक पाच बळी घेतले. शमीशिवाय मोहम्मद सिराजला सात षटकांत १६ धावा देत तीन बळी घेण्यात यश आले आणि जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा अनुक्रमे प्रत्येकी एक बळी घेण्यात यशस्वी ठरले.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने 88 आणि श्रेयस अय्यरने 82 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने पाच बळी घेतले.
शमीने (मोहम्मद शमी) श्रीलंकेविरुद्ध 5वी विकेट घेतली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ४५ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत शमीने Mohammed Shami माजी डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानला (४४ विकेट) मागे टाकले. एवढेच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ बळी घेणारा शमी भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
शमीच्या डोक्यावर चेंडू घासण्याचे रहस्य शुभमन गिलने उघड केले
सामन्यादरम्यान शमीने (मोहम्मद शमी) 5 विकेट पूर्ण केल्या. यानंतर मोहम्मद शमीने चेंडू डोक्यावर ठेवून ड्रेसिंग रुमच्या दिशेने इशारा केला. या घटनेवर शुबमन गिलने सामन्यानंतर खुलासा केला की शमीने Mohammed Shami टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हाब्रे यांना औदार्य दाखवत संकेत दिले होते. बॉलिंग कोच पारस म्हाब्रे यांच्या डोक्यावर केस नसल्याने त्यांनी सांकेतिक इशारा केला असल्याचे शुभमन गिलने सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
No better feeling than to get a fifer in a winning cause 👌🏻
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 2, 2023
Wankhede stadium 🏟️ you were special #TeamIndia on the charge 😎 #CWC23 pic.twitter.com/mwip4PXkCC