मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव पंतप्रधान मोदी व भाजपाचे नवीन घोषणा वाक्य सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे मोदी की गॅरंटी म्हणून सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जातो अशी गॅरंटी दिली जाते मात्र पंतप्रधान मोदी यांच्या पिएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना मात्र त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा न झाल्याची गॅरंटी मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी वर्गांच्या बँक खात्यावरून बघण्यास मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या यवतमाळ येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी पिएम किसान चा सोळावा हप्ता एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केला आहे तसेच खुद्द मोदी यांनी आपल्या भाषणातून माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया जमा केले तर पंधरा पैसेच येत होते.
आता मात्र मी एक बटन दाबले व लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा झाले असे संबोधित केले त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा ताबडतोब मेसेजही आला परंतु लँड शेडिंग आधार लिंकिंग आधार कार्ड एका गावचे व संबंधित शेतकऱ्याची शेती दुसऱ्या गावात या प्रॉब्लेम व इतर दुरुस्ती अभावी लाखो शेतकरी अजूनही पी एम किसान निधी व महाराष्ट्र शासनाचे नमो निधीपासून वंचित आहेत.
तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील कृषी प्रदर्शनात पीएम किसान व नमो योजनेतील त्रुटी दूर करण्याकरिता कॅम्प ठेवून अनेक शेतकऱ्यांचे खाते दुरुस्त केले परंतु त्यांच्याही खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे समजते त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी मोदी की गॅरंटी आमच्याकरिता नो गॅरंटी अशा प्रकारची चर्चा चालविली आहे.
संबंधित जिल्हा प्रशासन व कृषी विभाग सदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावे याकरिता कोणतेही प्रयत्न करीत नसल्याची खंत शेतकरी वर्गात होत असून अनेक शेतकऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत तर मालेगाव तालुक्यात पीएम किसान व नमो योजनेत पैसे न जमा झाल्याचे अनेक शेतकरी तहसील व कृषी कार्यालय मालेगाव येथे आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाही असा जवाब विचारत आहेत यावर शासनाने तोडगा काढून गरजू शेतकऱ्यांना लोकसभेची आचारसंहिता लागण्या अगोदर पि एम किसान व नमो योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.