आकोट – संजय आठवले
देशातील सर्व संवैधानिक संस्थाना बटीक करून भाजपा सरकार देशात व्देषाच राजकारण करीत आहे. विभिन्न समाज घटकांमध्ये सामाजिक दुफळी निर्माण करीत आहे.
असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, पद्मश्री सन्मानप्राप्त, राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी आकोट येथील चर्चासत्रा दरम्यान केले. माजी आमदार संजय गावंडे यांचे निवासस्थानी कुमार केतकर यांचे अनौपचारिक चर्चासत्रा आयोजित करण्यात आले होते.
ह्या चर्चासत्रात प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या स़ंसदेतील कार्यशैलीचे स्वानुभव विशद करतांना खासदार केतकर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.
केवळ विरोधकच नव्हे तर स्वपक्षातील खासदार आणि नेते सुद्धा मोदींच्या दहशती खाली वावरतांना दिसत असल्याचे सांगून पुढे ते म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत देश आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागास करून ठेवला आहे. आता परत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदींच्या हातात देशाची सुत्र दिलीत तर सामान्य नागरिकांना अनेक अराजकांना तोंड द्यावे लागेल.
तेव्हा सुशिक्षित आणि जाणकार लोकांनी पुढे येऊन समाज प्रबोधन करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखीत करुन देशातील भावी पिढी वाचवायची असेल तर देशातील भाजपा सरकार हद्दपार करण्याचे आवाहनही त्यांनी ह्या प्रसंगी केले. ह्या चर्चासत्रात अनेकांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून कुमार केतकर ह्यांनी सर्वांचे शंका निरसन केले.
येथे उल्लेखनीय आहे कि, कुमार केतकर हे प्रख्यात लेखक, पत्रकार, राजकीय मुत्सद्दी, परखड वक्ता व विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत. महत्वपूर्ण सांसदीय समीतीचेही ते विद्यमान सदस्य आहेत. देशातील अग्रगण्य वर्तमानपत्रांचे ते मुख्य संपादक राहिलेले आहेत. त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामूळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सद्यस्थितीत विदर्भातील राजकिय स्थिती व नागरिकांची मानसिकता जाणून घेण्याकरिता त्यांचा सपत्नीक दौरा सुरु आहे. ह्या दौर्याचा एक भाग म्हणून सामान्य नागरिकांचे घरी जावून ते त्यांचेशी संवाद साधित आहे. आकोट दौर्यात त्यांनी काॅंग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून संजय आठवले यांचे घरी भेट दिली.
त्यानंतर त्यांनी माजी आमदार संजय गावंडे यांचे निवासस्थानी उपस्थित मान्यवरांशी चर्चा केली. ह्या चर्चासत्राचे प्रास्ताविक भारत जोडो अभियानाचे समन्वयक प्रशांत गावंडे ह्यांनी केले. ह्या प्रसंगी आकोट शहरातील विविध पक्षांतील व संघटनेतील मंडळी प्रामुख्याने संजय गावंडे, प्रशांत पाचडे, विनायकराव मोडशे, मुकूंदराव गावंडे, पंजाबराव सिरसाठ,
प्रा. राजेंद्र पुंडकर, दिलीप बोचे, दिपक वर्मा, सतिश हाडोळे, दिवाकर गवाई, कैलास गोंडचर, सतिश देशमुख, अनोख रहाने, नागेश इंगळे, साहेबराव पाटील भगत, ज्ञानेश्वर ढोले, राजाभाऊ भालतिलक, बंडू पाटील बोरोकार, बंडू पाटील कुलट, नीळकंठ मेतकर, संग्रामसिंग ठाकूर, सिकंदर मर्दाने, भूषण पर्वतकर, मनिष कराळे, विजय ढेपे,
निनाद मानकर, शैलेश इंगोले, अमोल पालेकर, नागेश आग्रे, सोनोने, रवी पाटील अरबट, बंडू पाटील दोड, अविनाश डिक्कर, कमलकिशोर वर्मा, मिलींद झाडे, संदिप भुस्कट, संदिप आग्रे, सुभाष सुरत्ने, आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन ॲड. मनोज खंडारे ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय आठवले ह्यांनी केले.