Sunday, December 22, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | विनयशील श्रीलंकन संघाचे वर्षावासा दरम्यान भारतात आगमन...

मूर्तिजापूर | विनयशील श्रीलंकन संघाचे वर्षावासा दरम्यान भारतात आगमन…

मूर्तिजापूर – धम्म मंगलम बहुउद्देशीय संस्था, मूर्तिजापूर जि.अकोला यांचे मार्फत श्रीलंकेमधील आदरणीय, विनयशील भंते न्यानसिरी आणि त्यांचा भिक्खू संघ यांचे भारतात दिनांक आठ जुलै रोजी आगमन होत आहे. आपल्या बारा दिवसाच्या वास्तव्यादरम्यान धम्मंगलम संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध ठिकाणी ध्यान साधना शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

धम्म मंगलम’ ही संस्था गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्रभर तथागत भगवान बुद्धांच्या धम्म प्रचार व प्रसार करण्याचे काम करीत आहे. म्यानमार येथील पाओक मॉनेस्ट्री व श्रीलंका येथील नावयाना फॉरेस्ट मॉनेस्ट्री यांच्या धरतीवर महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर येथे निसर्गरम्य वातावरणामध्ये दहा एकर जमिनीवर ‘चित्तविवेका आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र’ उभारण्याचे काम धम्ममंगलम संस्थेतर्फे हाती घेण्यात आले आहे.

तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म जसाच्या तसा जनसामान्यांमध्ये कसा रुजवता येईल या प्रांजळ हेतूने धम्मंगलम संस्थेमार्फत महाराष्ट्रभर प्रत्यक्ष ध्यानसाधना शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. कोरोना काळापासून ते आज पर्यंत रोज सकाळी ऑनलाईन ध्यानसाधना घेतली जाते.

गेल्या तीन वर्षापासून या सकाळच्या ध्यानसाधना सत्रामध्ये झूम मीटिंग द्वारा 300 पेक्षा जास्त साधक नियमितपणे सहभागी होत असतात. तसेच संस्थेमार्फत बाहेरील देशांमध्ये विनयशील भंतेजींना ऑनलाइन प्रवचनासाठी आमंत्रित केल्या जात असते.

आदरणीय भिक्खू संघाचे आगमन झाल्यानंतर प्रथमतः नागपूर येथे 8 व 9 जुलै रोजी करुणा सांस्कृतिक भवन बजाज नगर, नागपूर या ठिकाणी दोन दिवसीय ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी आदरणीय भिक्खू संघाच्या हस्ते चित्त विवेका ध्यान साधना केंद्रावर वर्षावासाची सुरुवात रीतसर पद्धतीने करण्यात येणार आहे. अकोला येथे 14 जुलै रोजी धम्म प्रवचन व भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

तदनंतर भिक्खू संघाचे आगमन मुंबईमध्ये होणार आहे. नवी मुंबईतील डॉ आंबेडकर समता भवन सेक्टर 10 सानपाडा येथे 15 जुलै रोजी एक दिवसीय ध्यानसाधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 16 व 17 जुलै रोजी दर्शन मॅरेज हॉल कल्याण (पूर्व ) येथे दोन दिवसीय ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या दुर्मिळ संधीचा लाभ जास्त साधकांना घेता यावा यासाठी यासंबंधीचे सर्व पत्रक तथा पोस्टर्स विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आलेले आहे.

यादरम्यान खरी ध्यान पद्धती शिकण्याची संधी सर्वांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे. कृपया जास्तीत जास्त नागरिकांनी याचा आवश्य लाभ घ्यावा.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: