गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १६ मार्च च्या सायंकाळ पासुन देशात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी तिन टप्प्यांत निवडणुक घेण्यात येणार आहे.
विदर्भातील पांच जागांसाठी पहिल्या टप्प्यात दि.१९ एफ्रिल ला मतदान घेण्यात येणार आहे.या पाच जागांमधे भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणुक १९ एफ्रिल ला संपन्न होईल.मात्र या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवांराबद्दल सस्पेन्स कायम असल्याने उमेदवार कोण राहणार ? याची उत्सुकता संभावीत उमेदवारांसोबत दोन्ही जिल्ह्यातील नेते,कार्यकर्ते तथा मतदारांमधे लागली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. १९ एफ्रिल ला निवडणुक आहे. २० मार्च पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असुन २७ मार्च उमेदवारी दाखल करण्याचा अंतीम दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ७ ते ८ दिवसाचा कालावधी आहे.
अशा परिस्थितीत अजुन पर्यंत एकही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचे नाव जाहीर केले नाही.त्यामुळे सर्वत्र सस्पेन्स कायम असुन मतदारांमधे संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र नावलौकिक क्षेत्र आहे.
या क्षेत्रात मोठमोठ्या दिग्गजांनी आपले भाग्य अजमावले आहे. कुणाला यश आले तर कुणाला अपयश आले.नेहमीच बदल घडवणारा क्षेत्र म्हणुन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राकडे पाहीले जाते. या क्षेत्रात एकुण १० लाख ९० हजार ३५९ मतदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत १४ उमेदवारांनी निवडणुक लढविली होती. त्यामधे भाजपाचे सुनिल मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते घेवुन निवडणुक जिंकली होती.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात भंडारा जिल्ह्यात तुमसर,साकोली, व भंडारा हे तिन विधानसभा क्षेत्र आहेत.तर गोंदिया जिल्ह्यात तिरोडा,गोंदिया, अर्जुनी मोर, व आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्र आहेत. मागील विधानसभेचा ईतिहास पाहीला तर भंडारा विधानसभातुन नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष म्हणुन निवडुन आले होते.
तुमसर विधानसभेमधुन राष्टवादी काॅग्रेसचे राजु कारेमोरे, तर साकोली विधानसभेतुन काॅग्रेसचे नानाभाऊ पटोले निवडुन आले होते.तर गोंदिया जिल्ह्यातुन तिरोडा विधानसभा क्षेत्रातुन भाजपाचे विजय रहांगडाले, अर्जुनी मोर. विधानसभेत राष्टवादी काॅग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे निवडुन आले.गोंदिया विधानसभा क्षेत्रातुन विनोद अग्रवाल अपक्ष निवडुन आले तर आमगाव/देवरी विधानसभेतुन काॅग्रेसचे सेहशराम कोरेटी हे निवडुन आले होते.
एकंदरीत विचार केला तर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील सात विधानसभा क्षेत्रात अपक्ष दोन आमदार,राष्टवादी काँग्रेस दोन आमदार,काॅग्रेसचे दोन आमदार, तर भाजपाचे एकमेव आमदार निवडुन आले होते. या लोकसभा क्षेत्रात सात विधानसभा क्षेत्र येत असले तरी आमगाव देवरी विधानसभा ही गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येते हे विशेष, १९ एफ्रिल ला होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीत उमादवारींचा संभ्रम दिवसेंदिवस वाढत आहे.
कारण राज्यात सध्या अजीत पवार /प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट,भाजपा, व शिंदे गट यांची युती आहे.प्रफुल्ल पटेल हे नुकतेच राज्यसभेवर गेल्याने भाजपसाठी हा क्षेत्र मोकळा झाला असे समजण्यात येत होते.मात्र अलिकडे सडक/अर्जुनी येथे झालेल्या राष्टवादी च्या मेळाव्यात खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी आपन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातुन दावा सोडला नसल्याचे सांगीतल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
त्यामुळे ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला हा सस्पेन्स कायम आहे.तर भाजपाकडुन अनेक इच्छुक उमेदवारांनी दावा केला असला तरी उमेदवारी मिळवण्यासाठी वर्तमान खासदार सुनिल मेंढे व माजी पालकमंत्री डाॅ. परिणय फुके यांचे मधे उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा चालू असल्याचे दिसत आहे. या दोघांच्या स्पर्धेमुळे कुणी तिसराच आश्चर्यकारक उमेदवार मिळणार तर नाही ना ? या चर्चांना उधान आले आहे.
तर काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा हा गृहक्षेत्र आहे.अजुन पर्यंत काॅग्रेशनेही उमेदवारांचे पत्ते उघड केले नाही.काॅग्रेस मधेही उमेदवीरावुन प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. नानाभाऊ पटोले यांनी स्वतः निवडणुक लढविली तर या लोकसभा क्षेत्रात कमालीची रंगत पहायला मिळणार आहे.
सर्वच नेते एकमेकांचे पत्ते उघडण्याची वाट तर बघत नाही ना ? हा संभ्रम निर्माण झाला आहे. काही कां असेना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सात आठ दिवस शिल्लक आहेत. उमेदवारींसाठी कोण बाजी मारतो हे लवकरच कळून जनतेच्या मनातील सस्पेन्स दुर होणार असुन २०२४ चा नवा खासदार कोण हे ४ जुनलाच कळेल.