रामटेक – राजु कापसे
मनसर वरुन पश्चिमेस ५ किमी असलेल्सा आमडी -पारशिवनी चौरस्त्यावर जीवघेणे खड्डे तयार झाले आहे. गेल्या अनेक दिवसात अनेक दुचाकी वाहनांचे याठिकानी अपघात झाल्याची माहीती आहे. खड्डे न बुजवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रस्तारोको आंदोलन करण्यात आले व मनसेच्या दणक्यात कामाला सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे.
आमडी-पारशिवनी चौरस्त्यावर मोठेमोठे जिवघेणे खड्डे तयार झाले होते. पावसाच्या पाण्याने खड्डे पुर्णतः भरुन असल्याने दुचाकी चालकांना खड्ड्यांचा अंदाज न लागल्याने अनेक वाहनचालक क्षत्रिग्रस्त झाल्याचे दिसुन येत होते. नुकतेच आंदोलनाच्या अगोदरच्पा दिवशीच एका दुचाकीचा खड्यांमुळे अपघात झाला ,यात दुचाकी चालकाची पत्नी व मुलगी गंभीररीत्या जखमी झाले.
असे दिवसेंदिवस होणारे अपघात थांबल्या पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी आमडी-पारशिवनी मार्गावर रस्तारोको आंदोलन केले. व प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली व रोडांमध्ये पडलेल्या खड्ड्यामध्ये झाडे लावून प्रशासनाचा जोरदार विरोध केला. मनसेचा दणका बघुन तात्काळ खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली.
सदर आंदोलन मध्ये मनसे जिल्हा उपाध्पक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष मा. शेखरभाऊ दूंडे मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. सुरेशजी वांदिले , मनसे पारशिवनी तालुका अध्यक्ष डँनी धनुरे , मनसे रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे , मनसे तालुका उपाध्यक्ष राँकी चवरे, मनसे शेतकरी सेना पारशिवनी अध्यक्ष प्रदिप मनगटे , विक्की नांदुरकर, विक्की धुर्वे तसेच रामटेक- पारशिवनी तालुक्यातील सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.