Sunday, November 24, 2024
Homeराज्यमनसे जिल्हाध्यक्षांच्या रागावर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...

मनसे जिल्हाध्यक्षांच्या रागावर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

राजीनामा देण्यात शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह रामटेक पारशिवनी मौदा येथील पदाधिकाऱ्यांचा समावेश…

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला अंतर्गत कलहाचा फटका…

पत्र परिषदेत केला राजीनामे देण्याच्या कारणांचा खुलासा…

रामटेक – राजू कापसे

मनसे जिल्हाध्यक्ष आम्हाला विश्वासात घेऊन कार्य करत नाही तथा आम्हाला त्यांच्याकडुन सतत डावलण्यात येत असल्याचा ठपका ठेवत नाराज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह रामटेक मौदा पारशिवनी येथील पदाधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या भराभर राजीनामे दिले तेव्हा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामटेक विधानसभा क्षेत्रातील मनसेला फटका बसल्याने रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये मनसे कोलमडल्याची चित्र दिसून येत आहे.

काल दिनांक 10 जुलैला शहरातील दीप हॉटेलमध्ये एक पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले यांचेसह रामटेक पारशिवनी येथील तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख तथा मौद्या येथील पदाधिकारी उपस्थित होते. पत्र परिषदेदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी एकामागून एक उभे होत जिल्हाध्यक्षांंबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

आम्हाला विश्वासात घेऊन जिल्हाध्यक्ष कार्य करत नाही तथा आम्हाला नेहमी त्यांच्याकडून डावलण्यात येते असे सांगत जणू प्रत्येकानेच जिल्हाध्यक्षांबाबतचा आपला अनुभव यावेळी समोर मांडला यावेळी सर्वच पदाधिकारी रागात तथा संतापलेल्या मुद्रेमध्ये दिसून येत होते. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले तथा रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे यांनी ‘ जिल्हाध्यक्षांवर पक्षातील बहुतांश पदाधिकारी खूप जास्त नाराज आहोत, जिल्हाध्यक्षांची कार्यपद्धती सर्वांना विचारात घेण्याची नसून पदाधिकाऱ्यांना सतत डावलण्याची असल्याने त्यांचे नेतृत्व आम्हास पटण्यासारखे नाही व त्यांच्या नेतृत्वात कार्य करणे आम्हा सगळ्यांना कठीण होत असल्याचे ‘ सांगितले.

तसेच या प्रकाराबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींना वारंवार सांगितल्यावरही ते सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी हताश होऊन आम्ही हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगत आम्ही सर्व पदाधिकारी आज एकत्रितरीत्या आपापले राजीनामे जिल्हाध्यक्षांच्या रागावर दिले असल्याचे स्पष्ट केले. पत्रपरीषदेत यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना चे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले, मनसे रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे, रामटेक उपतालुका अध्यक्ष प्रफुल पुसदेकर, रामटेक तालुका संघटक मनोज पालीवार, उपाध्यक्ष बजरंग काटोले,

रामटेक तालुका अध्यक्ष विनायक महाजन, अमित बादुले, पारशिवनी शेतकरी तालुका अध्यक्ष प्रदीप मनगटे, पारशिवनी शहर अध्यक्ष शेखर केळवदे, उपजिल्हा अध्यक्ष नागपूर कुंदन राऊत, उपतालुकाप्रमुख रामटेक शुभम दौदलकर व शेतकरी सेना अध्यक्ष रामटेक तालुका अनिवेश देशमुख, अनिल मुलमुलेआदी.पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसे जिल्हाध्यक्षांचे आमदारकीचे स्वप्न भंगणार

एकीकडे ‘ मनसे जिल्हाध्यक्ष हे रामटेक चे भावी आमदार होणार ‘ असल्याची बातमी नुकतीच काही दिवसापूर्वी एका हिंदी वर्तमानपत्रात झळकून आली तथा त्यात असाही उल्लेख आहे की रामटेक किंवा उमरेड विधानसभा क्षेत्रातून मनसे जिल्हाध्यक्षांना पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मिळू शकते त्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचा उल्लेखही सदर बातमीमध्ये आहे.

तर दुसरीकडे मनसे जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळे खूप दिवसांपासून नाराज असलेल्या मनसे शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह रामटेक पारशिवनी व मौदा येथील तालुकाप्रमुख उपतालुका प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक दहा जुलैला टोकाची भुमीका घेत भराभर राजीनामे दिल्याने मनसे जिल्हाध्यक्षांचे आमदारकीचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: