MLC Result : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शुक्रवारी मतदान झाल आहे. आता त्याचा निकालही जाहीर झाला आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ११ उमेदवारांचा निकाल हाती आला आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचा पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लागला आहे. योगेश टिळेकर हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून जिंकून आले होते. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचादेखील विजय झाला आहे. योगेश टिळेकर यांच्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या विजयी ठरल्या. त्यानंतर भाजपचेच उमेदवार परिणय फुके हे विजयी झाल्याची तिसरी बातमी आली. भाजपकडे 103 मतं असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांचा विजय होणं हे साहजिक आहे. भाजपच्या पाचव्या उमेदवारासाठी चुरस असणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनादेखील या निवडणुकीत चांगलं यश मिळाले आहे. ठाकरे गटाचे हक्काचे केवळ 16 मते होती. असं असताना त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार
1) पंकजा मुंडे
2) परिणय फुके
3) सदाभाऊ खोत
4) अमित गोरखे
5) योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
1) शिवाजीराव गर्जे
2) राजेश विटेकर
शिवसेना
1) कृपाल तुमाने
2) भावना गवळी
शिवसेना ठाकरे गट
1) मिलिंद नार्वेकर
शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार
1) जयंत पाटील (शेकाप)
काँग्रेस
1) प्रज्ञा सातव