सांगली – ज्योती मोरे.
पदमाळे येथे केंद्र सरकारच्या हर घर जल जीवन मिशन योजने अंतर्गत गावातील नळ पाणी पुरवठा योजनेतून पाण्याच्या पाईपलाईनच्या ५० लाखाच्या कामाचे उदघाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच संजय कांबळे, माजी उपसरपंच सचिन जगदाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य जयसिंग गुरव, चंदाराणी जगदाळे, अभीजीत जगदाळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील शिंदे, शरद पाटील, सिकंदर मुलाणी, रमेश जगदाळे, पांडुरंग शिंदे, विलास पाटील, बाळासाहेब पवार, अशोक जगदाळे,
अमित सुतार, विकास मदने, साहील मुलाणी, विशाल कांबळे, रोहीत सावंत, अमर मोरे, राजू मोहिते, अनिल कोळी, शंकर जगदाळे, जूबेर करीम, रुपेश कोळी, शशिकांत जगदाळे, राजू कदम, गणपती साळुंखे, सुरज पाटील व सुरेखाताई मोहिते, नीताताई जगदाळे, यास्मीन मुलाणी, रेश्माताई कुरणे, नीताताई मदने, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावातील मुस्लिम समाजाचे वतीने त्यांच्या मागणीनुसार कामे पूर्ण केलेबद्दल आमदार सुधीरदादा गाडगीळ सत्कार करण्यात आला. यावेळी पदमाळे गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. आभार नुतन ग्रामपंचायत सदस्य अभीजीत जगदाळे यांनी मानले..