Monday, December 23, 2024
Homeराजकीयमानधनवाढसह विविध मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू आमदार सुधीर गाडगीळ; अंगणवाडी कर्मचारी संघटना...

मानधनवाढसह विविध मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करू आमदार सुधीर गाडगीळ; अंगणवाडी कर्मचारी संघटना शिष्टमंडळाला ग्वाही; अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविणार…

सांगली – ज्योती मोरे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करू विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठवू, अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

मानधन वाढ, ग्रॅज्युईटीसह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी राज्यभरातील तब्बल २ लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस २० फेब्रुवारी पासून संपावर आहेत. राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार सुधीर गाडगीळ यांची भेट घेतली. मानधनवाढीसह अन्य मागण्यांबाबत आमदार गाडगीळ यांच्याशी चर्चा केली. मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाध्यक्षा शोमा कोल्हे, उषा कांबळे, संतोषी लपाटे, सुनिता सहस्रबुध्दे, अशा चव्हाण, सचिव उमेश देशमुख यांच्यासह मोत्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या

दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. राज्यातील भाजप- शिवसेनेचे सरकार संवेदनशील आहे. अंगणवाडी कर्मचान्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल त्यांना न्याय देईल. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करू तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही या मागण्यांबाबत आवाज उठवू अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी अंगणवाडी कर्मचारी शिष्टमंडळाला दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: