सांगली – ज्योती मोरे
बिसूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. बिसुर येथील रस्ते व गटारीच्या कामाचा शुभारंभ आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी शासनाच्या २५/१५ ग्रामविकास योजनेमधून ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पुढे बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर विकासकामे गतीने होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. बिसूर मधील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.
यापुढच्या काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. यामध्ये गावातील सूर्यकांत पाटील घर ते विठ्ठल पाटील घरापर्यंत बंदिस्त गटर करणे, जगन्नाथ पाटील घर ते अंकुश निकम घरापर्यंत गटर करणे, सखाराम आनंद जाधव प्लॉट ते राजेश वसंत मंडले घरापर्यंत खडीकरण मुरमीकरण करणे, खोतवाडी रस्ता ते प्रमोद धोंडीराम पाटील घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे आणि बाबुराव भगत घर ते अनिल साळुंखे घरापर्यंत बंदिस्त गटर व रस्ता कॉंक्रिटकरण करणे या कामांचा आमदार गाडगीळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच सतीश नीलकंठ, उपसरपंच भारत पाटील, आदी ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच संतोष पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, चेअरमन हनुमंत पाटील व्हा चेअरमन शारदाताई पाटील, सुशांत पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, महादेव पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील, राजेंद्र साळुंखे, तानाजी कदम, गणपती साळुंखे यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.