बुलढाणा – हेमंत जाधव
बुलढाणा जिल्ह्यात अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील चीखली च्या विद्यमान आमदार भाजपा नेत्या श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.पो कॉ अजय गिरी असे अंगरक्षकाचे नाव असून ते बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. त्यांनी आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सर्व्हिस पिस्टल ने स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अजून कळू शकले नाही पुढील तपास पोलिस करीत आहेत.