अकोला – अमोल साबळे
बाळापुर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील आताच्याच नुकत्याच मुसळधार पावसाने पुर आल्याने शेती वाहून गेल्याने व थकीत कर्जाला कंटाळून दिलीप राजाराम सूर्यवंशी वय ४६ या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व तीन मुले आहेत तसेच अंदुरा येथील कर्जाला कंटाळून शेतकरी गजानन नारायण धबळकर यांनी सुद्धा आत्महत्या केली असता त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली पत्नी व म्हातारी आई असा मोठा परिवार त्यांच्या मागे आहे.
यावेळी बोरगाव वैराळे व अंदुरा येथील दोन्ही कुटुंबांना बाळापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन देशमुख यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील प्रत्येक सदस्यांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सांत्वन भेट दिली.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटन प्रमुख उमेश जाधव, अनिरुद्ध देशमुख, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, भूपेंद्र राजपूत, गोपाल वडतकार व असंख्य शिवसेना पदाधिकारी तसेच अंदुरा व बोरगाव वैराळे येथील असंख्य नागरिक उपस्थित होते