अकोला – अमोल साबळे
बाळापुर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथील यावर्षीच्या सततच्या मुसळधार पावसाने पुरामुळे शेती वाहून गेल्याने व थकीत कर्जाला कंटाळून दिलीप राजाराम सूर्यवंशी या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे त्यांच्या पश्चात आई, भाऊ ,पत्नी व तीन मुले आहेत तसेच अंदुरा येथील सातत्याने पूर व नापिक कर्जाला कंटाळून शेतकरी गजानन नारायण धबळकर यांनी सुद्धा गळफास लावून आत्महत्या केली असता त्यांच्या पक्षात त्यांच्या दोन मुली पत्नी व म्हातारी आई असा बराच मोठा परिवार त्यांच्या मागे आहे.
यावेळी बोरगाव वैराळे व अंदुरा येथील दोन्ही कुटुंबांना बाळापुर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन देशमुख यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील प्रत्येक सदस्यांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सांत्वन भेट दिली व शासनाकडून शक्य होईल ती मदत करण्यात येइल असे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक उमेश जाधव, शिवसेना नेते अनिरुद्ध देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे, भूपेंद्र राजपूत, गोपाल वडतकार व असंख्य शिवसेना पदाधिकारी तसेच अंदुरा व बोरगाव वैराळे येथील असंख्य नागरिक उपस्थित होते.