बाळापूर – सुधीरआप्पा कांबेकर
बाळापूर मतदारसंघात निवडणुकीच्या तिरंगी लढ़वतीमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांनी बाळापूर मतदार संघावर दुसऱ्यांदा भगवा फड़कवला आहे. विजयी झाल्या नंतर नितीन देशमुख यांनी सोमवारी मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
बाळापूरत झालेली निवडनुक अनेक मुद्यांनी रंगलीअसली तरी शेवटी जनतेने स्थानिक विकास कामांकडे पाहून मतदान केल्याचे निकालावरून स्पष्ट होते.शेतकऱ्यांच्या समस्या सोड़वण्यासाठी थेट संघर्षाची तयारी व आंदोलन यामुळे शेतकऱ्यांचा कल त्यांच्या कड़े वाढला. खारपाणपट्यातील पाणीसमस्येला वाचा फोडण्यासाठी आ. नितीन देशमुख यांनी पायी दिंडी काढली होती, हा विषय मोठा गाजला होता.
शिवसेना फुटीनंतर आमदार देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. ते स्वतः उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. तसेच त्यांनी विकासाचा मुद्दा निवडणूक प्रचारात मांडला,त्याला मतदारांनी भरभरून साथ दिल्याने त्यांनी दुसयांदा विजय मिळवला आहे. आ. नितीन देशमुख यांनी सोमवारी मुंबई येथे जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले,तसेच ठाकरे कुटुंबाकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. अरविंद सावंत, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, जनसेवक बबलू देशमुख उपस्थित होते.