बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी जवळील विद्रूपा नदीचे अरुंद पुला जवळ मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.गेली पंधरा वर्षे मूर्तिजापूर मतदारसंघात आमदार असलेले हरीश पिंपळे ह्यांनी कमालीची निष्क्रियता दाखवली म्हणून वंचित बहूजन युवा आघाडी बार्शीटाकळी तालुक्याचे वतीने त्या अपघात प्रवण स्थळाचे नामकरण ‘आमदार हरिश पिंपळे ऍकसिडेंट स्पॉट’ केले होते.
आपल्या सुमार कामगिरी वर युवा आघाडीने बोट ठेवल्याने आमदार पिंपळे अस्वस्थ झाले असून ‘रस्ता मंजूर झाला होता, त्यावेळेस भारिपवाल्यांनी चिपको आंदोलन करून, चौपदरी करण्याचं काम बंद पाडल्याचा’ हास्यास्पद खुलासा त्यांनी केला आहे.
मुळात मुद्दा रस्त्याचा नव्हे तर अरुंद पुलाचा आहे.त्या एकाच ठिकाणी होणारे अपघात अरुंद पुलामुळे होत आहेत.१५ वर्षात पूल झाला असता तर अनेक नागरिक सुरक्षित राहू शकले असते मात्र आपली निष्क्रियता लपविण्यासाठी आमदार पिंपळे ह्यांनी वंचित मुळे रस्ता झाला नसल्याची सांगून जनतेची दिशाभूल सुरू केली आहे.मात्र आमदार पिंपळे हे धडधडीत खोटे बोलत असल्याचे त्याचे स्टेटमेंट मध्ये स्पष्ट होत आहे.
अकोला मंगरूळ रस्ता वरील १०० वर्षेपेक्षा जुने वृक्षांची कत्तल करण्याचा प्लान आखण्यात आला होता.रस्ता मंजूर झाला होता, त्यावेळेस दोन्ही बाजूला असलेल्या पाईपलाईन मुळे रस्ता रुंदीकरण करतांना १८०० पेक्षा अधिक पुरातन वृक्ष तोडले जात असल्याने वंचित बहूजन आघाडी ने चिपको आंदोलन करून १८०० पुरातन वृक्ष वाचविले आहेत.हीच बाब आमदार पिंपळे ह्यांनी कबूल केली आहे.
आपल्या कबुलीजबाब मध्ये आमदार म्हणाले की, ‘महानगरपालिका यांची पाण्याची पाइपलाइन दोन्हीकडे असल्यामुळे, पाइपलाइन शिफ्टिंगसाठी ९०० कोटीचा खर्च आहे. ते नॅशनल हायवे देण्यास तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, हे महानगरपालिकेने पाइप सिस्टिमचे काम केले पाहिजे. पण महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ९०० कोटी खर्च करायची नाही. या कामासाठी मी नागपूर अधिवेशनमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.
महानगरपालिकेला अमृतमध्ये शासनाने पैसा दिला तर लगेच चौपदरी करण्याचे काम मंजूर होऊन हे काम पूर्णत्वास जाईल यासाठी माझ्याकडून पाठपुरावा सुरू आहे’ असा खुलासा आमदारांनी केला आहे.जर दोन्ही बाजूला पाईपलाईन आहे तर त्यावर रस्ता चौपदरीकरण करणार होते का आमदार ह्याचा त्यांनी खुलासा केला पाहिजे.रस्ताचे काम ९०० कोटी खर्चून पाण्याचे पाईपलाईन शिफ्ट न झाल्याने थांबले आहे.
त्याचा ‘चिपको आंदोलन’ सोबत काही एक संबंध नाही.आपली निष्क्रियता लपविण्यासाठी आमदारांनी वंचित वर बिल फाडुन जनतेची दिशाभूल करू नये.पाईपलाईन शिफ्टिंगच्या आड आपली निष्क्रियता लपवू नका.कान्हेरी चा धोकादायक पूल लवकर तयार करा आणि जनतेच्या जीवाशी खेळ करू नका असे आवाहन वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केले आहे.