Sunday, December 22, 2024
Homeराज्यआमदार अँड फुंडकर व खासदार जाधव यांनी झेंडी दाखवून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस...

आमदार अँड फुंडकर व खासदार जाधव यांनी झेंडी दाखवून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस झाली रवाना…

खामगाव – आमदार अँड आकाश फुंडकर व खासदार प्रतापराव जाधव यांनी झेंडी दाखविल्यानंतर पंढरपूर साठी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी रवाना झाली. आज 26 जून रोजी दुपारी 12 वाजता ही पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. आ अँड आकाश फुंडकर यांनी या विशेष रेल्वे चे पूजन केले.

त्यानंतर आ अँड फुंडकर व खासदार प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली. व पंढरीच्या दिशेने रेल्वे रवाना झाली. यावेळी आ अँड फुंडकर यांनी वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पांडुरंगाचा जयघोष करण्यात आला. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, महेंद्र रोहनकार, राजेंद्र धनोकर, प्रदेश भाजप सदस्य सौ अनिताताई देशपांडे, सौ जान्हवी कुलकर्णी, सौ शिवानी कुलकर्णी, गणेश जाधव, सुरेश घाडगे, संजय घोगरे, अशोक हत्तेल, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख पवन गरड,

शहराध्यक्ष शुभम देशमुख, नगेंद्र रोहनकार, रवी गायगोळ, प्रसाद एदलाबादकर, मयूर घाडगे, संतोष येवले, विक्की हत्तेल, कमलेश हवेलीया, आकाश भडासे, रोशन गायकवाड, निकुंज मंदाणी, आदी भाजप पदाधिकारी यांचेसह शिवसेनेचे संजय अवताडे, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: