Monday, December 23, 2024
Homeराजकीयआमदार बच्चू कडूंचे राणा दाम्पत्यावर जोरदार टीकास्र...म्हणाले किराणा वाटणारे...पाहा Video

आमदार बच्चू कडूंचे राणा दाम्पत्यावर जोरदार टीकास्र…म्हणाले किराणा वाटणारे…पाहा Video

अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे राणा दाम्पत्य यांच्यात नेहेमीच शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळते, तर बच्चू कडू हेही जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपले शाब्दिक टोमणे देत असतात. काल अमरावतीत एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांना टोला लगावत म्हणाले आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का?…

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केलं आहे. तर यावर आमदार बच्चू कडू म्हणाले…डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मात्र, आपण या अधिकाराचं पतन करत पुन्हा किराणा देणाऱ्याला निवडून देतो,

यावेळी बच्चू कडू म्हणाले, काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवालही बच्चू कडूंनी विचारला आहे. त्यांनी नाव न घेता राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला आहे.

गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी अप्रत्यक्ष राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: